बुमराहच्या 'टीम इंडिया'मध्ये रिंकू सिंग डेब्यू करेल का? अशी असू शकते Playing XI

आजपासून आयर्लंड विरूद्ध भारताची टी२० मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:27 AM2023-08-18T11:27:20+5:302023-08-18T11:28:52+5:30

whatsapp join usJoin us
India vs Ireland 1st T20 Live Updates predicted Playing XI for Team India under Jasprit Bumrah as captain with Ruturaj Gaikwad Rinku Singh | बुमराहच्या 'टीम इंडिया'मध्ये रिंकू सिंग डेब्यू करेल का? अशी असू शकते Playing XI

बुमराहच्या 'टीम इंडिया'मध्ये रिंकू सिंग डेब्यू करेल का? अशी असू शकते Playing XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Ireland 1st T20, Rinku Singh: विंडिज विरूद्धच्या टी२० मालिकेत ३-२ अशी हार पत्करल्यानंतर भारतीय संघ आजपासून आयर्लंड विरोधात टी२० मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे. तब्बल वर्षभरापेक्षा जास्त कालावधीनंतर भारतीय वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. तो संघाचे नेतृत्व करणार आहे तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपदाची जबाबदाी आहे. आयर्लंडच्या संघापुढे भारतीय संघ कागदावर बलाढ्य वाटत असला तरी विंडीजमधील पराभवानंतर भारताला आता दमदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. अशा वेळी भारतीय संघ नव्या दमाच्या जोरावर मैदानात उतरणार आहे. पाहूया या संघाच्या अंतिम ११ मध्ये कोणकोणत्या खेळाडूंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

भारतीय संघात सलामीवीर म्हणून उपकर्णधार ऋतुराज गायकवाडची जागा पक्की आहे. त्याच्यासोबत यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळेल. अनुभवाच्या जोरावर संजू सॅमसन तिसऱ्या तर फॉर्मच्या बळावर तिलक वर्मा चौथ्या स्थानी खेळेल. अष्टपैलू खेळाडूंच्या जागेसाठी तगडी स्पर्धा असली तरी शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान दिले जाऊ शकते. त्यासोबतच IPL मध्ये दमदार फिनिशर म्हणून नावारूपाला आलेल्या रिंकू सिंगला टी२० पदार्पणाची संधी मिळू शकते.

गोलंदाजीच्या ताफ्यात भारताला यशस्वी व आघाडीचा गोलंदाज परतला आहे. जसप्रीत बुमराह संघाची जबाबादारी सांभाळण्यासोबतच गोलंदाजीच्या आघाडीचेही नेतृत्व करणार आहे. त्याच्या संघात नव्या दमाचा मुकेश कुमार व प्रसिध कृष्णा असेल. तर मनगटी स्पिनर म्हणून रवी बिश्नोईला संघात स्थान देण्यात येईल.

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग ११- जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा, रवी बिश्नोई.

Web Title: India vs Ireland 1st T20 Live Updates predicted Playing XI for Team India under Jasprit Bumrah as captain with Ruturaj Gaikwad Rinku Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.