Join us  

IND vs IRE 1st T20: आयर्लंड विरूद्धच्या T20 साठी टीम इंडियाच्या 'या' ३ बाहुबली खेळाडूंवर असेल नजर!

आज रंगणार पहिला टी२० सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 10:50 AM

Open in App

IND vs IRE 1st T20: भारत आणि आयर्लंड ( (India vs Ireland) यांच्यातील टी२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला टी२० सामना मालाहाईड येथे रात्री 9 वाजता (भारतीय वेळेनुसार) खेळवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा युवा संघ मैदानात उतरत आहे. संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षकही नवीन असणार आहे. कारण सीनियर खेळाडूंचा संघ नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंडविरुद्ध संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आहेत. अशा परिस्थितीत, युवा संघाला आपल्या अंगचे कलागुण दाखवण्याची ही उत्तम संधी असणार आहे. त्यामुळे या सामन्यांत त्यांना सर्वोत्तम ११ खेळाडूंसह मैदानात उतरायचे आहे.

सर्वोत्तम प्लेइंग ११ खेळाडू मैदानात येणे हा भारतासाठी मोठा मुद्दा आहे. भारताने आजपर्यंत आयर्लंड विरुद्ध एकही टी२० सामना गमावलेला नाही. भारताने आतापर्यंत खेळलेले तीनही टी२० सामने एकतर्फी जिंकले आहेत. आता चौथ्या टी२० मध्येही भारताला ते रेकॉर्ड कायम ठेवायचे आहे. त्या अनुषंगाने  टीम इंडियामधील ३ 'बाहुबलीं'च्या खेळावर साऱ्यांची नजर असणार आहे.

भारतीय संघातील ३ बाहुबली म्हणजे सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक आणि कर्णधार हार्दिक पांड्या. या तीनही खेळाडूंनी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००हून अधिक धावा केल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट देखील दमदार आहे. सूर्यकुमारचा स्ट्राईक रेट १६५.५६ आहे. दिनेश कार्तिकचा स्ट्राईक रेट १४८.३३ आहे तर हार्दिक पांड्याचा १४७ स्ट्राईक रेट आहे.

उमरान मलिकला मिळू शकते पदार्पणाची संधी

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आज उमरान मलिकचे पदार्पण होण्याची शक्यता आहे. या शिवाय दीपक हुड्डा यांनाही संधी मिळू शकते. आज वेगवान गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमारवर असेल. त्याच बरोबर फिरकी विभागाची धुरा युजवेंद्र चहल सांभाळेल. आणि सिनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड व इशान किशन सलामीची संधी मिळेल.

आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी२० साठी असा असू शकतो संघ- इशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, युझवेंद्र चहल

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयर्लंडहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादवदिनेश कार्तिक
Open in App