Join us  

india vs ireland T-20 LIVE : भारताचा आयर्लंडवर 76 धावांनी विजय

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी दिली आणि भारताला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 लढतीत 208 धावा केल्या. रोहित आणि धवन यांनी तब्बल 160 धावांची सलामी देत संघाला दमदाार सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 9:02 PM

Open in App
ठळक मुद्देरोहितने 61 चेंडूंत 8 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 97 धावा फटकावल्या.

- भारताचा आयर्लंडवर 76 धावांनी विजय

 

- आयर्लंडचा डाव गडगडला; 13 षटकांत 6 बाद 96

 

- केव्हिन ओब्रायन बाद; आयर्लंडला पाचवा धक्का

 

- कुलदीप यादवने शॅनॉनला बाद करत आयर्लंडला मोठा धक्का दिला

 

- आयर्लंडला पहिला धक्का; बुमराहने केले स्टर्लिंगला बाद

 

आयर्लंडविरुद्ध भारताचे द्विशतक

- रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी दिली आणि भारताला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 लढतीत 208 धावा केल्या. रोहित आणि धवन यांनी तब्बल 160 धावांची सलामी देत संघाला दमदाार सुरुवात करून दिली. धवनने 45 चेंडूंत प्रत्येकी पाच चौकार आणि षटकारांच्या जोरावर 74 धावांची खेळी साकारली. धवन बाद झाल्यावर रोहितने अखेरच्या षटकापर्यंत किल्ला लढवला, पण त्याचे शतक यावेळी तीन धावांनी हुकले. रोहितने 61 चेंडूंत 8 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 97 धावा फटकावल्या.

-  प्रथम फलंदाजी करताना भारताच्या 208 धावा

 

- रोहित शर्माचे शतकाचे स्वप्न भंगले; अखेरच्या षटकात 97 धावांवर बाद

- भारताला पहिला धक्का; शिखर धवन बाद

- अर्धशतकानंतर रोहित शर्माचा दमदार षटकार

- रोहित शर्माचे 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण

 

- षटकारासह सलामीवीर शिखर धवनचे अर्धशतक पूर्ण 

 

- अकराव्या षटकात भारताचे शतक पूर्ण

- भारत 10 षटकांत बिनबाद 94

भारताची आयर्लंडविरुद्ध दमदार फलंदाजी

ड्युब्लिन : भारताचा बुधवारी शंभरावा ट्वेन्टी-20 सामना आयर्लंडविरुद्ध रंगत आहे. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

 

दोन्ही संघ

 

 

टॅग्स :टी-20 क्रिकेटभारतआयर्लंडक्रिकेट