India vs Nepal Live Marathi Update : पहिला सामना पावसामुळे वाया गेल्याने टीम इंडियाला १ गुणावर समाधान मानावे लागले. आज आशिया चषक स्पर्धेत नेपाळविरुद्ध विजय मिळवून सुपर ४ मध्ये जाण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. नेपाळला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून हार मानावी लागली होती आणि प्रथमच आशिया चषक खेळणाऱ्या या संघाकडून आजच्या सामन्यात चांगला खेळ होण्याची अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराह माघारी परतल्याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमीला संधी मिळणे नक्कीच होते.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांना अपयश आले होते. KL Rahul च्या जागी संधी मिळालेल्या इशान किशन ( ८२) आणि उप कर्णधार हार्दिक पांड्या ( ८७) यांनी १३८ धावांची विक्रमी भागीदारी करून भारताचा डाव सावरला होता. भारताच्या इनिंग्जनंतर पावसामुळे सामना रद्द करावा लागला. त्यामुळे गोलंदाजांना संधीच मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या मागचं कारणही रोहितने सांगितले. मागील सामन्यात गोलंदाजांना संधी मिळाली नसल्याने आज प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे रोहितने सांगितले.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज