पावसामुळे खेळ थांबला! षटकं कमी झाल्यास DLS नुसार टीम इंडियासमोर असेल खडतर आव्हान

India vs Nepal Live Marathi Update : आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत का खेळवती जातेय, अशा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. त्यात भारतीय संघाच्या सामन्यात पावसाची हमखास हजेरी, ठरलेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 08:35 PM2023-09-04T20:35:41+5:302023-09-04T20:36:06+5:30

whatsapp join usJoin us
India vs Nepal Live Marathi Update : Rain stops play in Pallekele with India 17-0 in 2.1 overs, If overs are reduced, what will be India's DLS target?  | पावसामुळे खेळ थांबला! षटकं कमी झाल्यास DLS नुसार टीम इंडियासमोर असेल खडतर आव्हान

पावसामुळे खेळ थांबला! षटकं कमी झाल्यास DLS नुसार टीम इंडियासमोर असेल खडतर आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Nepal Live Marathi Update : आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत का खेळवती जातेय, अशा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. त्यात भारतीय संघाच्या सामन्यात पावसाची हमखास हजेरी, ठरलेली आहे. पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करावी लागली. भारतीयांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली, परंतु गोलंदाजांचा सराव काही झाला नाही. आज नेपाळविरुद्ध गोलंदाजांचा सराव झाला, तर फलंदाजांना डग आऊटमध्ये बसून रहावे लागेल अशी चिन्हे आहेत. नेपाळच्या डावातही पावसाने व्यत्यय आणला होता. पण, त्यांना पूर्ण ५० षटकं खेळता आली. मात्र, आता भारताच्या डावात पावसाने जोरदार एन्ट्री घेतलीय अन् डकवर्थ लुईस नियमानुसार षटकं कमी झाल्यास टीम इंडियासमोर खडतर लक्ष्य असू शकते.


नेपाळच्या फलंदाजांनी आज भारताविरुद्धच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात आत्मविश्वासाने खेळ केला. सलामीवीर  कुशल भुर्तेल ( ३८) आणि आसिफ शेख यांनी ६५ धावांची भागीदारी केली. आसिफने ९७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी पहिल्या ५ षटकांत ३ झेल सोडले. गुलशन झा ( २३) याने चांगली फटकेबाजी केली. दिपेंद्र सिंग ऐरी ( २९) आणि सोमपाल कामी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.  सोमपालने ५६ चेंडूंत ४८ धावा केल्या आणि संघाला २३० धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. भारतीयांचे क्षेत्ररक्षण आज अत्यंत गचाळ झाले आणि त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा प्रचंड नाराज दिसला. रवींद्र जडेजाने मधल्या षटकांत ३ धक्के दिल्याने भारताला आधार मिळाला. मोहम्मद शमीनेही ३ विकेट्स घेतल्या.


सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले गेले आहे. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी सावध सुरूवात करताना २.१ षटकांत १७ धावा चढवल्या आहेत. पण, पावसाची जोरदार एन्ट्री झाल्याने सामना थांबवावा लागला आहे. पण, जर षटकं कमी झाल्यास DLS नुसार भारतासमोर कोणतं लक्ष्य असू शकतं?
४५ षटकांत २२० धावा
४० षटकांत २०७ धावा
३५ षटकांत १९२ धावा
३० षटकांत १७४ धावा
२० षटकांत १३० धावा 
 

Web Title: India vs Nepal Live Marathi Update : Rain stops play in Pallekele with India 17-0 in 2.1 overs, If overs are reduced, what will be India's DLS target? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.