India vs Nepal Live Marathi Update : भारताविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नेपाळने तुलनेने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. भारतीय खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात बऱ्याच चुका झाल्या. २०१८मध्ये वन डे क्रिकेटचा दर्जा मिळालेल्या नेपाळचा खेळ पाहून भलेभले चकित झाले. त्यांच्या खेळात आत्मविश्वास दिसला अन् क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुकांमुळे कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसला. त्यात पावसाची भर पडली अन् ३७.५ षटकानंतर मॅच थांबवावी लागली.
रोहितकडून मिळाली प्रेरणा! विराट कोहलीने एका हाताने झेल टिपला अन् आनंदात हसला, Video
भारतीय खेळाडूंकडून सुरुवातीच्या पाच षटकांत ३ झेल सुटले त्याचा फायदा घेत कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांनी ६५ धावांची भागीदारी केली, परंतु शार्दूल ठाकूरने ही जोडी तोडली. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) फिरकीच्या तालावर नेपाळला नाचवले आणि ३ विकेट्स घेतल्या. भीम शार्की ( ७), नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल ( ५) आणि कुशल मल्ला ( २) यांची विकेट त्याने घेतली. आसिफने एक बाजून लावून धरताना ८८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. गुलशन झा याचे फटके पाहण्यासारखे होते. मोहम्मद सिराजला त्याने मारलेला अपर कट, त्यानंतर यष्टिरक्षक-स्लीपमधून लेट कट मारून मिळवलेला चौकार पाहून भारतीयांनीही कौतुक केले.
हा सामना रद्द झाल्यास नेपाळ व भारत यांना प्रत्येकी १-१ गुणावर समाधान मानावे लागेल. पाकिस्ताननंतर ( ४) अ गटातून भारत २ गुणांसह सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवेल.