India vs Nepal Live Marathi Update : भारतीय खेळाडूंकडून आज सुरुवातीच्या पाच षटकांत क्षेत्ररक्षणात चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी नेपाळच्या सलामीवीरांना जीवदान दिले. पण, कर्णधार रोहित शर्माने स्वतः एक अफलातून झेल घेतला. रोहितच्या या कॅचनंतर विराट कोहलीला ( virat Kohli) प्रेरणा मिळाली आणि शॉर्ट कव्हरला त्याने एका हाताने कॅच घेतली.
रोहित शर्माचा अफलातून कॅच!विराटसह सहकाऱ्यांना शिकवलं कसा पकडायचा झेल, Video
कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांनी ६५ धावांची भागीदारी केली, परंतु शार्दूल ठाकूरने ही जोडी तोडली. त्यानंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) फिरकीच्या तालावर नेपाळला नाचवले. मोहम्मद शमीच्या पहिल्या आणि पाचव्या, तर मोहम्मद सिराजने टाकलेल्या दुसऱ्या षटकात विराट, श्रेयस अय्यर व इशान किशन यांची सोपे झेल टाकले. शार्दूल ठाकूरने १०व्या षटकात कुशल ३८ ( २५ चेंडू, ३ चौकार व २ षटकार) धावांवर बाद केले. त्यानंतर रवींद्र जडेजाने ३ धक्के देताना भीम शार्की ( ७), नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल ( ५) आणि कुशल मल्ला ( २) यांची विकेट घेतली. कर्णधार रोहितने नेपाळचा कर्णदार पौडेलचा स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला.
आसिफने एक बाजून लावून धरताना ८८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. गुलशन झा याचे फटके पाहण्यासारखे होते. मोहम्मद सिराजला त्याने मारलेला अपर कट, त्यानंतर यष्टिरक्षक-स्लीपमधून लेट कट मारून मिळवलेला चौकार पाहून भारतीयांनीही कौतुक केले. सिराजने नेपाळला पाचवा धक्का दिला. आसिफ ९७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५८ धावा करून बाद झाला. यावेळी विराटने शॉर्ट कव्हरवर एका हाताने अप्रतिम झेल घेतला. सिराजने त्याच्या पुढच्या षटकात गुलशनची ( २३) विकेट मिळवून दिली. नेपाळला १४४ धावांवर सहावा धक्का बसला. वन डे क्रिकेटमधील विराटही ही १४३ वी कॅच ठरली अन् त्याने रॉस टेलरचा ( १४२) विक्रम मोडला. माहेला जयवर्धने ( २१८), रिकी पाँटिंग ( १६०) व मोहम्मद अझरुद्दीन ( १५६) यांनी सर्वाधिक झेल घेतले आहेत.
Web Title: India vs Nepal Live Marathi Update : The smiles and happiness of Virat Kohli when he takes a one handed Blinder catch, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.