India vs Nepal Live Marathi Update : पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे वाया गेल्याने १ गुणावर भारतीय संघाला समाधान मानावे लागले आहे. आज आशिया चषक स्पर्धेत नेपाळविरुद्ध विजय मिळवून सुपर ४ मध्ये जाण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, पहिल्या ७ चेंडूंत रोहितचा पारा चढलेला पाहायला मिळाला. त्याला विराट कोहली, श्रेयस अय्यर व इशान किशन हे कारणीभूत ठरले.
पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजांना संधी मिळाली नसल्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे रोहितने सांगितले. पण, आता क्षेत्ररक्षकांना सराव मिळण्यासाठी काय करायला लागेल, असा प्रश्न रोहितला पडला असेल. मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात श्रेयस अय्यरने स्लीपमध्ये, तर मोहम्मद सिराजच्या चेंडूवर शॉर्ट कव्हरला विराट कोहलीने सोपा झेल टाकला. शमीच्या सहाव्या चेंडूवर नेपाळचा सलामीवीर कुशल भुर्तेलचा सोपा झेल श्रेयसने स्लीपमध्ये टाकला. त्यानंतर दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर आसिफ शेखने शॉर्ट कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू विराटला सहज टिपता आला असता, परंतु त्याच्याकडून झेल सुटल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज