भारत विरुद्ध न्यूझीलंड: यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जसप्रीत बुमराहला विकेटचे खाते उघडता आले असले तरी किवींच्या तळाच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. पदार्पणवीर कायले जेमिसनने गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही कमाल दाखवली. त्याला कॉलीन डी ग्रॅंडहोम आणि ट्रेंट बोल्ट यांची तुल्यबळ साथ मिळाली. भारताच्या १६५ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करताना १८३ धावांची निर्णायक आघाडी घेतली.जेमिसनने ४४ धावा चोपल्या आणि त्यात ४ षटकारांचा समावेश होता. ग्रॅंडहोम आणि बोल्ट यांनी अनुक्रमे ४३ आणि ३८ धावा केल्या. त्यामुळे एकावेळी ७ बाद २२५ धावांवर असलेल्या न्यूझालंडनं पहिल्या डावात ३४८ धावांपर्यंत मजल मारत भक्कम आघाडी घेतली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- NZ vs IND, 1st Test : न्यूझीलंडच्या शेपटाने धू धू धुतले; पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली
NZ vs IND, 1st Test : न्यूझीलंडच्या शेपटाने धू धू धुतले; पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली
न्यूझीलंडकडे भक्कम आघाडी; भारतीय फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 6:33 AM