नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर फलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवला. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीला रोहित शर्मा व विराट कोहली यांची मिळालेली साथ यामुळे भारताने 156 धावांचे सुधारित लक्ष्य सहज पार केले. भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी केली. त्याने किवींच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. मोहम्मद शमीने तीन, तर युजवेंद्र चहलने दोन विकेट घेतल्या. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
02:18 PM
भारताची मालिकेत आघाडी
01:48 PM
भारत विजयापासून 17 धावा दूर
01:41 PM
विराट कोहली 45 धावांवर माघारी, भारताला विजयासाठी हव्यात 24 धावा
01:19 PM
शिखर धवनचे अर्धशतक
01:08 PM
कॅप्टन कोहलीनंतर 'गब्बर'च, शिखर धवनची लाराच्या विक्रमाशी बरोबरी
India vsNew Zealand 1st ODI : कॅप्टनकोहलीनंतर'गब्बर'च, शिखरधवनचीलाराच्याविक्रमाशीबरोबरीhttps://t.co/TaK0RXk2R9@BCCI#NZvIND@SDhawan25
— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) January 23, 2019
01:02 PM
विराट कोहली व शिखर धवन यांच्यात अर्धशतकी भागीदारी
12:09 PM
भारताच्या एक बाद 44 धावा
11:54 AM
खराब वातावरणामुळे खेळ थांबला
11:06 AM
भारताच्या बिनबाद 41 धावा
10:16 AM
न्यूझीलंडचा डाव 157 धावांत गुंडाळला
10:09 AM
न्यूझीलंडचा नववा गडी बाद
10:00 AM
न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ
09:57 AM
न्यूझीलंडच्या 7 बाद 146 धावा
09:53 AM
मोहम्मद शमीचे शतक; सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज
India vsNew Zealand 1st ODI : मोहम्मदशमीचेशतक; सर्वातजलद100 विकेट्सघेणाराभारतीयगोलंदाजhttps://t.co/6WlN3zGxJI@BCCI@MdShami11#NZvsIND#INDvNZ#NapierODI
— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) January 23, 2019
09:41 AM
मोहम्मद शमीला आणखी एक यश
09:16 AM
कुलदीप यादवची सुपर डाईव्ह, किवींचा निम्मा संघ माघारी
09:02 AM
युजवेंद्र चहलच्या फिरकीची कमाल
08:39 AM
न्यूझीलंडचा तिसरा धक्का; रॉस टेलर 24 धावा काढून माघारी
08:33 AM
न्यूझीलंडचं अर्धशतक; केन विल्यम्सन, रॉस टेलर यांची चिवट फलंदाजी
08:14 AM
न्यूझीलंडची सावध फलंदाजी
07:57 AM
मोहम्मद शमीचा विक्रम; कमी सामन्यात 100 बळींचा टप्पा गाठणारा भारतीय गोलंदाज ठरला शमी
07:48 AM
मोहम्मद शमीचा भेदक मारा; मुन्रो 8 धावांवर बाद
07:45 AM
कॉलिन म्युन्रोराचे लागोपाठ दोन चौकार
07:44 AM
मोहम्मद शमीला पहिलं यश; मार्टिन गप्टिल अवघ्या 5 धावांवर बाद
07:34 AM
भारतीय संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), एम. एस. धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, अंबाती रायडू, विजय शंकर, कुलदीप यादव, यझुर्वेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
07:32 AM
न्यूझीलंड संघ- मार्टिन गप्टिल, कॉलिन म्युन्रो, केन विल्यिम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोलस, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिशेल सँटनर, डग ब्रेसवेल, टिम साऊदी, लॉरी फर्ग्युसन, ट्रेंड बोल्ट
07:14 AM
न्यूझीलंडनं टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
Web Title: India vs New Zealand 1st ODI : भारताची विजयी सलामी, मालिकेत 1-0ने आघाडी
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.