India vs New Zealand T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारी रोजी JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम रांची येथे खेळवला जाईल. या मालिकेत भारताचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे, तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांना शुक्रवारी आणखी एक भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहायला मिळणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंडचा पुरुष संघ २७ जानेवारीला ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहे. दुसरीकडे, २७ जानेवारीला १९ वर्षांखालील महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड एकमेकांना भिडणार आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंड संघाशी होणार आहे.
इशान किशन ३२ क्रमांकाची जर्सी का घालतो? जाणून घ्या कोण आहे त्याचा क्रिकेट आयडॉल, Video
सुपर सिक्स फेरीच्या सुरुवातीला भारतीय १९ वर्षांखालील महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ ८७ धावांवर ऑल आऊट झाला होता, परंतु महिला संघाने पुढच्या सामन्यात शानदार पुनरागमन करत श्रीलंकेचा सात विकेट्स राखून पराभव केला. भारताची उपकर्णधार श्वेता सेहरावतची फलंदाजी खूप महत्त्वाची होती. पाच डावांत २३१ धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ती दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर डावखुरी फिरकीपटू मन्नत कश्यप आणि लेगस्पिनर पार्श्वी चोप्रा यांनीही मोलाचे योगदान दिले आहे.
१९ वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना सेनवेस पार्क, पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. त्याचवेळी, भारत विरुद्ध न्यूझीलंड या पुरुष संघांमधील सामना JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम रांची येथे सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs New Zealand 1st T20I and India U 19 vs New Zealand U 19 Both match played in 27 January, check Details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.