India vs New Zealand, 1st T20I, Captain Rohit Sharma on ensuring player security : विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोडल्यानंतर आता टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा ( Rohit Sharma) सांभाळणार आहे. त्याच्या जोडीला राहुल द्रविड ( Rahul Dravid) हाही मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे ही नवी जोडी टीम इंडियाला आणखी किती उंचीवर नेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी रोहितनं पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यानं विराट कोहली ( Virat Kohli) बद्दल मोठं विधान केलं.
रोहित शर्मा म्हणाला,'' द्रविड आणी मी खेळाडूंना मोकळेपणानं खेळण्यास सांगणार आहे. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये त्यांनी तसाच खेळ करणे अपेक्षित आहे. असे करताना प्रत्येकवेळी तुम्हाल यश येईलच असं नाही. पण, या सर्वांना खात्री देतो की त्यानं संघातील तुमच्या स्थानावर कोणताही धोका निर्माण होणार नाही.''
''संघातील अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व जाणून आहे, पण आम्हाला प्रत्येकाला मोठं करत पुढे जायचंय. एक संघ म्हणून कशी चांगली कामगिरी करता येईल, यावर आमचा फोकस आहे. त्यामुळे संघाच्या यशासाठी काय गरजेचं आहे, त्यावर आमचे लक्ष असणार आहे,''असेही रोहितनं स्पष्ट केलं.
न्यूझीलंड संघाच्या प्रत्येक खेळाडूवर आमचे लक्ष असेल. वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी वेगळ्याच उंचीवरचा खेळ केला होता. केन विलियम्सन संघात नसला तरी त्यांचे अन्य खेळाडूही मॅच विनर आहेत, असे मत व्यक्त करून त्यानं विराटच्या भविष्यातील भूमिकेबाबतही मत व्यक्त केले. ''विराट कोहलीची संघातील भूमिका तिच राहील. तो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. तो जेव्हा जेव्हा खेळलात, त्यानं त्याची छाप सोडलीय. तो सामन्यात त्याचा प्रभाव सोडतोच,'' असे रोहित म्हणाला.
Web Title: India vs New Zealand, 1st T20I: India T20I Captain Rohit Sharma Comments On Virat Kohli's Role In The Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.