बंगळुरुच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यातील खेळ दुसऱ्या दिवशी सुरु झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा भारतीय संघाचा निर्णय चांगलाच फसला आहे. उपहाराआधी भारतीय संघाने अवघ्या ३४ धावांत ६ विकेट्स गमावल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जैस्वाल १३ धावा करून परतल्यानंतर लंचपर्यंत पंत १५ धावांवर नाबाद खेळत होता. हे दोन फलंदाज सोडले तर अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. घरच्या मैदानावर पाहुण्यासमोर टीम इंडिया बऱ्याच वर्षांनी मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
५ जणांच्या पदरी भोपळा!
रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट गमावल्यानंतर विराट कोहली खूप वर्षांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण ९ चेंडूचा सामना करून त्याला शून्यावर माघारी परतावे लागले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या सर्फराज खानलाही ३ चेंडू खेळूनही खाते उघडता आले नाही. आल्या आल्या मोठा फटका कमारण्याच्या नादात झेलबाद होऊन परतला. य़शस्वी जयस्वाल ६३ चेंडूटा सामना करून १३ धावांवर तंबूत परलला. यशस्वीची विकेट गमावल्यानंतर लोकेश राहुलकडून टीम इंडियाला मोठी अपेक्षा होती. पण त्यालाही मैदानात काही तग धरता आला नाही. एवढेच काय तर ६ चेंडू खेळून तोही शून्यावर माघारी फिरला. रविंद्र जडेजानं त्याची कॉपी पेस्ट केली. तोही ६ चेंडू खेळून शून्यावर तंबूत परतला. लंचनंतरच्या खेळाला सुरुवात झाल्यावर आर अश्विनने त्यात आणखी भर घातली. मॅट हॅन्रीनं अश्विनला खातेही उघडू दिले नाही.
३४ वर्षांत तिसऱ्यांदा न्यूझीलंडच्या संघानं टीम इंडियानं आणली ही वेळ!
१०९० नंतर तिसऱ्यांदा भारतीय संघानं घरच्या मैदानात खेळताना तिसऱ्यांदा १० किंवा त्यापेक्षा कमी धावांत आघाडीच्या तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले. याआधी २०१० मध्ये अहमदाबादच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने २ धावांवर ३+ विकेट्स गमावल्या होत्या. १९९९ मध्ये मोहालीच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघानेच भारतीय संघावर ७ धावांवर अशी वेळ आणली होती.