Join us  

लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)

पहिल्या डावात फुसका बार ठरल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने धमाका करुन दाखवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 5:01 PM

Open in App

Sarfaraz Khan Fourth Test Fifty Watch His Unreal Ramp Shot : न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटीतील पहिल्या डावात झिरो ठरलेल्या सर्फराज खाननं दुसऱ्या डावात हिरोवाली झलक दाखवून दिली. आपल्या कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात चौथे अर्धशतक झळकावताना त्याने काही अप्रतिम फटके मारले. ज्यात त्याच्या सिग्नेचर शॉटचाही समावेश होता. त्याची फटकेबाजी ही बंगळुरुच्या स्टेडियमवर गर्दी केलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्याच पारण फेडणारी होती.

बाउंसर  चेंडूवर दाखवला क्लास, सर्फराज खानचा शॉट होतो फर्स्टक्लास 

सर्फराज खानने अविश्वसनीय रॅम्प-शॉटसह न्यूझीलंडच्या विल्यम ओ'रुर्कला शानदार चौकार मारल्याचे पाहायला मिळाले. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुर्दैवी आउट झाल्यानंतर सर्फराज खान विराटला जॉईन झाला. पहिल्या डावात ३ चेंडू खेळूनही त्याला खाते उघडता आले नव्हेत. पण यावेळी त्याने आक्रमक अंदाजातच खेळीली सुरुवात केली. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील २७ व्या षटकात  त्याने ओ'रुर्क O'Rourke नं टाकलेल्या वेगवान  बाउंसर चेंडू सीमारेषेबाहेर धाडला. त्याचा हा शॉट बघून प्रेक्षकांनीही त्याला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. 

पहिल्या डावात फुसका बार, दुसऱ्या डावात केला मोठा धमाका

सर्फराज खान याने  ४२ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. चिन्नास्वामी स्टेडियमवरील त्याचा अंदाज हा खेळाडू लंबे रेस का घोडा आहे, हे म्हणालाय भाग पाडणारा होता. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून सर्फराज खान भारतीय संघाच्या ताफ्यात आहे. पण  गत मालिकेत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. शुबमन गिलच्या दुखापतीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. पहिल्या डावात फुसका बार ठरल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने धमाका करुन दाखवला.  

टॅग्स :सर्फराज खानभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड