ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडवर दुसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत सात विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा गेल्या दहा वर्षांतील न्यूझीलंडमधील हा पहिला विजय ठरला आहे. 2009 साली भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन ट्वेन्टी-20 सामने खेळला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता.
आतापर्यंत भारताला न्यूझीलंडमध्ये एकही ट्वेन्टी-20 सामना जिंकता आला नव्हता. 2009 साली भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला होता. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये भारताला न्यूझीलंडमध्ये एकाही ट्वेन्टी-20 सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. पण रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्यांदा न्यूझीलंडच्या धर्तीवर विजय मिळवता आला आहे.
पुढच्या सामन्यात रोहितला विश्वविक्रमाची पुन्हा संधीसध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम ख्रिस गेल आणि मार्टीन गप्तील यांच्या नावावर आहे. या दोघांनी आतापर्यंत 103 षटकार लगावले आहेत. रोहितने पुढच्या सामन्यात दोन षटकाल लगावले तर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो.
या सामन्यातील रोहितचा विश्वविक्रम या अर्धशतकी खेळीसह आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये रोहितच्या सर्वाधिक धावा झाल्या आहेत. यापूर्वी हा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलच्या नावावर होता. या सामन्यातील अर्धशतकासह रोहितच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामन्यात 2288 धावा झाल्या आहेत. गप्तीलच्या नावावर यापूर्वी 2272 धावा होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आता रोहितच्या नावावर आहेत.
कृणाल पंड्याने रचला इतिहास न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने इतिहास रचला आहे. कृणालने यावेळी कर्णधार केन विल्यमसनसहीत कॉलिन मुर्नो आणि डॅरील मिचेल यांना बाद केले. या सामन्यात तीन बळी मिळवत कृणालने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंतच्या ट्वेन्टी-20 सामन्यांत दोनपेक्षा जास्त बळी मिळवणारा कृणाल हा पहिला गोलंदाज ठरला आहे.