ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने इतिहास रचला आहे. कृणालने यावेळी कर्णधार केन विल्यमसनसहीत कॉलिन मुर्नो आणि डॅरील मिचेल यांना बाद केले. या सामन्यात तीन बळी मिळवत कृणालने इतिहास रचला आहे.
न्यूझीलंडमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या ट्वेन्टी-20 सामन्यांत भारताच्या गोलंदाजांना आतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नव्हती. गेल्या सामन्यात तर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिसे काढली होती. पण या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला. खासकरून कृणालने यावेळी चांगला मारा केला. तीन बळी मिळवत कृणालने न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. याबरोबरच न्यूझीलंडमध्ये आतापर्यंतच्या ट्वेन्टी-20 सामन्यांत दोनपेक्षा जास्त बळी मिळवणारा कृणाल हा पहिला गोलंदाज ठरला आहे.