भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज ऑकलंड येथील इडन पार्कवर सुरू आहे. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी न्यूझीलंडला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी टीम इंडियाच्या शार्दूल ठाकूरला लक्ष्य करताना चौकार-षटकार खेचले, पण त्याच शार्दूलला यश मिळालं. सहाव्या षटकात शार्दूलनं किवीच्या गुप्तीलला बाद केले. विराट कोहलीनं मिडऑफला झेल टीपला. गुप्तील 20 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 33 धावांवर माघारी परतला.
बाद होण्यापूर्वी गुप्तील आणि मुन्रो या जोडीनं एक विक्रम केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावांची भागीदारी करणारी ही सातवी जोडी ठरली. या विक्रमात शिखर धवन- रोहित शर्मा, के गोएत्झर व जॉर्न मुन्सी, डेव्हीड वॉर्नर व शेन वॉटसन, मार्टिन गुप्तील व केन विलियम्सन, केव्हीन ओ'ब्रायन व पी स्टर्लिंग, डब्ल्यू पोर्टरफिल्ड व स्टर्लिंग यांचा क्रमांक आहे.
गुप्तीलचा झेल टीपून विराट कोहलीनं हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला. सामन्याच्या नवव्या षटकात न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला. शिवम दुबेनं मुन्रोला बाद केले. 26 धावा करणाऱ्या मुन्रोचा कर्णधार कोहलीनं सुपर झेल टीपला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टीपणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीनं 41 झेल टीपले असून. त्यानं रोहित शर्माचा 39 झेलचा विक्रम मोडला. या विक्रमात सुरेश रैना 42 झेलसह अव्वल स्थानावर आहे.
थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, न्यूझीलंडनं जिंकली मालिका
BCCIला इशारा देणाऱ्या पाकिस्तानचे घुमजाव; आता विचारतात असं कधी म्हणालो?