भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना आज ऑकलंड येथील इडन पार्कवर होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या प्रजासत्ताक दिनी टीम इंडिया विजयी तिरंगा फडकावण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडला दुसऱ्या सामन्यातही नमवून भारतीयांना विजयी भेट देण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.
IND Vs NZ, 2nd T20I : टीम इंडियात बदलाचे वारे, दुसऱ्या सामन्यात असे असतील अंतिम अकरा शिलेदार
भारतीय संघानं पहिल्या सामन्यात 204 धावांचं आव्हान सहज पेललं. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्या फटकेबाजीनं भारताला विजय मिळवून दिला. पण, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल वगळता भारताच्या अन्य गोलंदाजांची किवी फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. त्यामुळे या सामन्यात यजमान न्यूझीलंडही कमबॅकसाठी उत्सुक आहेत.
सामना कुठे व कधी ?
- भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा सामनाः इडन पार्क, ऑकलंड
- वेळः दुपारी 12.20 वाजल्यापासून
- नाणेफेकः सकाळी 11.50 वाजता
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, जिओ टीव्ही अॅप
संभाव्य संघ
- भारताचा संघ - विराट कोहली (कर्णधार), संजू सॅमसन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.
- न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), हामिश बेन्नेट, टॉम ब्रूस ( 4-5 सामन्यासाठी), कॉलिन डी ग्रँडहोम ( पहिल्या तीन सामन्यांसाठी), मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेन, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट ( यष्टिरक्षक), इश सोढी, टीम साऊदी.