Join us  

IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 

ही विकेट भलेही अश्विनच्या खात्यात जमा झाली. पण याचं सर्व श्रेय हे सर्फराज खान याचेच होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:53 PM

Open in App

IND vs NZ , 2nd Test Day 1 Sarfaraz Khan  convince Rohit Sharma for brilliant DRS call Watch Video : बंगळुरुच्या कसोटी सामन्यात रिषभ पंतची विकेट वाचवण्यासाठी उड्या मारणारा सर्फराज खान पुण्याच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाला विकेट मिळवून देण्यासाठी टणाटण उड्या मारताना दिसून आले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगला आहे. या सामन्यात आर अश्विननं विल यंगच्या रुपात टीम इंडियाला दुसरी विकेट मिळवून दिली. ही विकेट भलेही अश्विनच्या खात्यात जमा झाली. पण याचं सर्व श्रेय हे सर्फराज खान याचेच होते.

 "आउट हाय... आउट हाय.." टणाटण उड्या मारत सर्फराजनं रोहितला DRS साठी मनवलं  

आर अश्विन याने लेग स्टंपच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू रिषभ पंतने शिताफिनं पकडला. पण ती विकेट मिळालीये, असं ना पंतला वाटलं ना अश्विननं काही अपिल केली. गोलंदाज आणि  विकेट किपर यांना विकेटची अजिबात खात्री वाटत नव्हती. पण फाइन लेगला फिल्डिंग करणारा सर्फराज कान मात्र चांगलाच अलर्ट होता. तो अगदी टणाटण उड्या मारत आउट हाय... आउट हाय... अस ओरडताना दिसून आले. मोठ्या आत्मविश्वासनं त्यानं कर्णधार  रोहित शर्माला रिव्ह्यू घेण्यासाठी मनवताना दिसला. त्याला विराट कोहलीनंही साथ दिली आणि भारतीय संघान रिव्ह्यूही घेतला. जो यशस्वी ठरला. सेट होत असलेल्या विल यंगला तंबूत परतावे लागले.

स्निको मीटरमध्ये पकडली गेली विल यंगची चोरी

भारतीय संघाने रिव्ह्यू घेतल्यानंतर अश्विनने टाकलेला तो चेंडू विल यंगच्या ग्लोव्ह्जला स्पर्श करून गेल्याचे पंचांच्या लक्षात आले. स्निकोमध्ये विल यंग लपवत असलेली चोरी पकडली गेली आणि  मैदानातील पंचांनी फलंदाज बाद असल्याचे घोषित केले. सर्फराज खान याने बंगळुरु कसोटीत आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवलीये. दमदार खेळीच्या जोरावर लोकेश राहुलला बाजूला ठेवून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवण्यात आले. या मुंबईकरानं विल यंगच्या विकेटसाठी कॅप्टनला रिव्ह्यूसाठी मनवत आपल्यातील निर्णय क्षमतेतील एक खास झलकही दाखवून दिली आहे. 

सर्फराजच्या आत्मविश्वासामुळे फुटली सेट झालेली जोडी 

पुण्याच्या मैदानात टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या धावफलकावर ३२ धावा असताना आर अश्विन याने टॉम लॅथमला पायचित करत संघाला पहिलं यश मिळवून दिले. त्यानंतर विल यंग आणि डेवॉन कॉन्वे ही जोडी अर्धशतकी भागीदारीच्या दिशेनं वाटचाल करत असताना सर्फराजच्या आत्मविश्वासामुळे अश्विनच्या खात्यात दुसरी विकेटही जमा झाली. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांचीभागीदारी रचली.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसर्फराज खानरोहित शर्माविराट कोहलीआर अश्विन