Join us  

India vs New Zealand 2nd Test : टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी, न्यूझीलंडचे पुनरागमन

India vs New Zealand 2nd Test : भारतीय गोलंदाजानं दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडला बॅकफुटवर टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 8:58 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूंझीलंड, दुसरी कसोटी : भारतीय गोलंदाजानं दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडला बॅकफुटवर टाकले. त्यांचा निम्मा संघ 133 धावांवर माघारी पाठवल्यानंतर टीम इंडिया सामन्यात मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. पण, पुन्हा एकदा न्यूझीलंडचे शेपूट वळवळले. कायले जेमिसन आणि नील वॅगनर यांनी नवव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करताना टीम इंडियाचे मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताला पहिल्या डावात केवळ 7 धावांची आघाडी घेता आली. 

LIVE UPDATES

न्यूझीलंडनं पहिल्या डावात 235 धावा करताना टीम इंडियाला केवळ 7 धावांच्या आघाडीवर समाधान मानण्यास भाग पाडले. दुसऱ्या डावातही टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी कायम राहिली. दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 97 धावांची आघाडी घेतली आहे, परंतु त्यांचा निम्मा संघ माघारी परतला आहे. 

- नाईट वॉचमन म्हणून उमेश यादव ( 1) यालाही ट्रेंट बोल्टनं त्रिफळाचीत केले

- ट्रेंट बोल्टनं चेतेश्वर पुजाराचा त्रिफळा उडवून न्यूझीलंडला विजयासमीप आणले.

- नील वॅगनरने टीम इंडियाला मोठा धक्का दिला. त्यानं रहाणे व पुजारा ही सेट जोडी तोडली. वॅगनरच्या गोलंदाजीवर रहाणे त्रिफळाचीत झाला. 

- विराट कोहलीवर पाच वर्षांनी ओढावली नामुष्की; मालिकेत लाजीरवाणी कामगिरी

- अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे.

- कॉलीन डी ग्रँडहोमनं विराट कोहलीला 14 धावांवर माघारी पाठवले. भारताला 51 धावांवर तिसरा धक्का बसला

रवींद्र जडेजाचा 'Super' झेल, भले भले झाले फेल; Video

- टीम साऊदीनं भारताला दुसरा धक्का दिला. त्यानं पृथ्वी शॉला ( 14) माघारी पाठवले. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर 26 धावांत माघारी परतले.

- न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झोडपलं, टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं

- दुसऱ्या डावातही मयांक अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टनं दुसऱ्याच षटकात त्याला बाद करून टीम इंडियाला मोठा धक्का दिला

- कर्णधार केन विलियम्सनला ( 3) जसप्रीत बुमराहनं स्वस्थात माघारी पाठवले. रॉस टेलर ( 15), हेन्री निकोल्स ( 14) यांनी मोठी खेळी साकारता आली नाही. टॉम लॅथमने 52 धावा केल्या, पण त्याला शमीनं बाद केले. न्यूझीलंडचा निम्मा संघ 133 धावांवर माघारी परतल्यानंतर टीम इंडियाला सामन्यात मजबूत पकड घेण्याची संधी होती. पण, कॉलीन डी ग्रँडहोम ( 26), नील वॅगनर ( 21) आणि कायले जेमिसन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.

- वॅगनर आणि जेमिसन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. जेमिसनने 63 चेंडूंत 49 धावा केल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांत गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आलं, परंतु त्यांना 7 धावांचीच आघाडी मिळाली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने 3, रवींद्र जडेजानं 2 विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडमोहम्मद शामीरवींद्र जडेजाजसप्रित बुमराह