Virat Kohli completely misses Mitchell Santner's Full Toss And Bowled : पुण्याच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीनं १ बाद १६ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. ही जोडी जमलीये असं वाटत असताना संघाच्या धावफलकावर ५० धावा असताना शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात आलेल्या विराट कोहलीकडून मोठी आस होती. पण तो तर फुलटॉस बॉलवरच फसला. मिचेल सँटनरनं टीम इंडियाला 'विराट' धक्का दिला.
विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुण्याच्या मैदानात खेळला पहिला कसोटी सामना
२०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहली पुण्याच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते. दुसऱ्या डावात त्याने फक्त १३ धावा केल्या होत्या. ही कसर त्याने २०१९ मध्ये या मैदानात दुसरा सामना खेळताना भरुन काढली होती.
पुण्याच्या मैदानातच आली विराट कोहलीची टेस्टमधील सर्वोच्च खेळी
पुण्याच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं द्विशतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमधील किंग कोहलीची सर्वोच्च खेळी इथंच आली होती. आफ्रिके विरुद्धच्या पुणे कसोटी सामन्यात विराट कोहलीनं ३३६ चेंडूत नाबाद २५४ धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने १३७ धावांनी जिंकला होता. यावेळीही तो मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती, पण तो अगदी स्वस्तात बाद झाला.
'विराट' खेळीची होती अपेक्षा, पण किंग कोहली स्वस्तात आटोपला
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील बंगळुरु कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहलीला खातेही उघडता आले नव्हते. पण त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ७० धावांची खेळी करत लयीत आल्याचे संकेत दिले होते. पुण्याच्या मैदानात तो यापेक्षा मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा होती. पण विराट कोहलीला ते जमलं नाही.
Web Title: India vs New Zealand, 2nd Test Day 2 Virat Kohli completely misses Mitchell Santner's Full Toss And Bowled For 1 Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.