पुण्यात Mitchell Santner चा पुन्हा 'पंजा'; टीम इंडियातील 'शेर' सपशेल ढेर

टीम इंडियाविरुद्ध तेही भारतीय मैदानात एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा सँटनर न्यूझीलंडचा पहिला फिरकीपटू ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:48 PM2024-10-26T14:48:37+5:302024-10-26T14:54:42+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand, 2nd Test Day 3 Second fifer in the game for Mitchell Santner With Rohit Sharma Shubman Gill Yashasvi Jaiswal Virat Kohli And Sarfaraz Khan Wicket | पुण्यात Mitchell Santner चा पुन्हा 'पंजा'; टीम इंडियातील 'शेर' सपशेल ढेर

पुण्यात Mitchell Santner चा पुन्हा 'पंजा'; टीम इंडियातील 'शेर' सपशेल ढेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd Test Day 3 Second fifer in the game for Mitchell Santner : पुण्याच्या मैदानात मिचेल सँटनरनं दुसऱ्या डावातही पंजा मारला. न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावातील १०३ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावातील २५५ धावांसह टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान ठेवले होते.

दुसऱ्या डावातही सँटनरनं घेतली भारतीय फलंदाजांची फिरकी  

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अगदी दिमाखात केली. पण सँटनरनं पुन्हा खेळ बिघडवला. त्याने रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला ३४ धावांवर पहिला धक्का दिला. सर्फराज खानची विकेट घेत त्याने दुसऱ्या डावातही पाच फाइव्ह विकेट्स हॉलचा पराक्रम करून दाखवला. त्याने मारलेल्या 'पंजा'मुळे टीम इंडियावर घायाळ होण्याची वेळ आली.

पहिल्या डावात ७ विकेट्सह दाखवला होता जलवा, दुसऱ्या डावात पुन्हा मारला 'पंजा'

मिचेल सँटनर याने पुणे कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ७ विकेट्स घेत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले होते.  कसोटी कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोच्च कामगिरीची नोंद केल्यावर दुसऱ्या डावातही तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. रोहित शर्माशिवाय ८ (१६)  दुसऱ्या डावात त्याने पुन्हा एकदा विराट कोहलीला १७ (४०) आपल्या जाळ्यात अडकवले. शुबमन गिलसह २३ (३१)  फिफ्टी साजरी करून तोऱ्यात खेळणाऱ्या यशस्वी जैस्वाललाही ७७ (६५) त्याने तंबूचा रस्ता दाखवला. सर्फराज खानही ९ (१५) पुणे कसोटीत दुसऱ्यांदा त्याच्या गोलंदाजीवर फसल्याचे पाहायला मिळाले.

टीम इडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला फिरकीपटू ठरला सँटनर  

टीम इंडियाविरुद्ध तेही भारतीय मैदानात एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा सँटनर न्यूझीलंडचा पहिला फिरकीपटू ठरला आहे. त्याच्याशिवाय न्यूझीलंडकडून डॅनियल व्हिटोरी याने दोन कसोटी सामन्यात  दोन्ही डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. पण त्याने ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघाविरुद्ध केली होती.  

  • डॅनियल व्हिटोरी- ५/६२ आणि ७/८७ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलंड (२०००)
  • डॅनियल व्हिटोरी- ६/७० आणि ६/१०० विरुद्ध बांगलादेश चट्टग्राम (२००४)
  • मिचेल सँटनर - ७/५३ आणि ५/६२ विरुद्ध भारत, पुणे (२००४)
     

Web Title: India vs New Zealand, 2nd Test Day 3 Second fifer in the game for Mitchell Santner With Rohit Sharma Shubman Gill Yashasvi Jaiswal Virat Kohli And Sarfaraz Khan Wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.