India vs New Zealand 2nd Test Live Updates । पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जात आहे. सलामीचा सामना गमावल्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान यजमान टीम इंडियासमोर आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या या शहरात रोहित शर्माची क्रेझ पाहायला मिळाली. सामना सुरू होताच चाहत्यांनी रोहितच्या नावाचा जयघोष करताना 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणांचा पाऊस पाडला. बंगळुरूतील पहिल्या कसोटीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आजपासून (गुरुवार) पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दुसरी कसोटी खेळत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडने आपल्या संघात १ बदल केला आहे. दुखापीतमुळे मॅट हेनरी संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी स्पिनर मिचेल सँटनरने संघात जागा मिळवली आहे. भारतानेदेखील संघात तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. वॉशिंग्टन सुंदर तब्बल साडे तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळत आहे. आकाश दीपला संघात स्थान मिळाले आहे आणि शुबमन गिल संघात आला आहे. केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांना संघातून वगळण्यात आले आहे.
भारताचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रिषभ पंत, शुबमन गिल, सर्फराज खान, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंडचा संघ -
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हिन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, जोशुआ फिलिप्स, टीम साउथी, मिचेल सँटनर, ओ'रुर्के, एजाझ पटेल.
Web Title: India vs New Zealand 2nd Test Live Updates Mumbai Cha Raja, Rohit Sharma chants at the Pune stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.