Join us

टीम इंडियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी; Mitchell Santner च्या नावे झाला हा खास रेकॉर्ड

IND vs NZ, 2nd Test, Mitchell Santner Claims Career Best Figures With First Five wicket haul : न्यूझीलंडच्या मिचेल ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:16 IST

Open in App

IND vs NZ, 2nd Test, Mitchell Santner Claims Career Best Figures With First Five wicket haul : न्यूझीलंडच्या मिचेल सँटनर याने पुण्याच्या मैदानात आपल्या फिरकीची जादू दाखवून देत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. भारतीय संघाच्या बॅटिंगला सुरुंग लावत त्याने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा प्रिन्स शुबमन गिलच्या रुपात पहिली विकेट घेणाऱ्या सँटनरनं जड्डूला तंबूचा रस्ता दाखवत पहिल्यांदाच पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये एन्ट्री मारली. इथंच तो थांबला नाही तर यात त्याने आणखी २ विकेट्सची भर घातली.   

टीम इंडियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला सँटनर

भारता विरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वोच्च कामगिरी करून दाखवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सँटनर तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. न्यूझीलंडकडून एजाज पटेलनं टीम इंडियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. २०२१ च्या दौऱ्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात त्याने ११९ धावा खर्च करून एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला होता. त्याच्या पाठोपाठ या यादीत  रिचर्ड हॅडली या दिग्गजाचा नंबर लागतो. वेलिंग्टन कसोटीत या जलदगती गोलंदाजाने २३ धावा खर्च करून ७ विकेट्स घेतल्या होत्या.   मिचल सँटनर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्याच्या मैदानात त्याने ५३ धावा खर्च करत ७ विकेट्स घेतल्या. टीम साउदीही टॉप ५ मध्ये आहे. २०१२ मध्ये साउदीनं बंगळुरु कसोटी सामन्यात ६४ धावा खर्च करून ७ विकेट्स घेतल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमध्ये कशी राहिलीये या फिरकीपटूची कामगिरी

२०१५ मध्ये न्यूझीलंडकडून पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या मिचेल सँटनरनं आतापर्यंतच्या   २९ कसोटी सामने खेळले आहेत. यातील ४८ डावात त्याच्या खात्यात ६१ विकेट्स जमा आहेत. गोलंदाजीशिवाय फलंदाजीमध्येही तो उपयुक्त खेळाडू आहे.  ४० डावात त्याच्या खात्यात ३ अर्धशतके आणि एका शतकासह ९३७ धावा आहेत.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ