भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी : यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचा किवी गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. टीम साऊदी, कायले जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट या त्रिकुटानं तर टीम इंडियाची दाणादाण उडवली. त्यात दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडच्या ताफ्यात प्रभावी मारा करणारा नील वॅगनर दाखल झाला आहे. पण, टीम इंडियाची चिंता वाढवणारा प्रसंग गुरुवारी घडला आहे. सराव सत्रात भारताच्या सलामीवीराचा डावा पाय सूजला आहे. त्यामुळे त्यानं सराव सत्रातूनही माघार घेतली आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला बसलेला हा मोठा धक्का आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉला कसोटीत सलामीला येण्याची संधी मिळाली, परंतु त्याला साजेसा खेळ करता आला नाही. मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली, परंतु तोही साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. विराटनं दोन्ही डावांत 2 व 19 अशा धावा केल्या. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेंची बाब बनला आहे. फलंदाजांच्या अपयशामुळे गोलंदाजांवरील दडपण वाढत आहे. अशात सलामीवीराची दुखापत म्हणून टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याचंच काम आहे.
पृथ्वी शॉनं गुरुवारी सराव सत्रातून माघार घेतली. त्याच्या डाव्या पायाला सूज आल्यानं त्यानं हा निर्णय घेतला आणि त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे. त्यात तो तंदुरुस्त नसल्याचे आढळल्यास टीम इंडियात शुभमन गिल पदार्पण करू शकतो. पृथ्वीला पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 30 धावा करता आल्या.
Video : क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी बनला शेतकरी; करतोय सेंद्रीय शेती
IPL 2020 : विराट कोहली ते एबीडी... जाणून घ्या, कोणाला किती 'पगार' देते RCB!
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारावर रोहित शर्मानं व्यक्त केली चिंता, म्हणाला...