क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)

आर अश्विन याने चेंडू हातात आल्यावर चतुराईनं गोलंदाजी करत सेटअप करून टॉम लॅथमला आपल्या जाळ्यात अडकवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:44 AM2024-10-24T11:44:21+5:302024-10-24T11:45:53+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand, 2nd Test Ravichandran Ashwin Traps Tom Latham With A Chess Move In The 2nd Test At Pune Watch Video | क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)

क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd Test  Ravichandran Ashwin Traps Tom Latham With A Chess Move : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.  न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथम याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडची सलामी जोडी जमली, पण...

पहिल्या सामन्यातील ऐतिहासिक विजयानंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली.  डेवॉन कॉन्वे आणि टॉम लॅथम या दोघांनी संघाच्या डावाची सुरुवात केली. दोन्ही सलामीवीर अगदी आरामात डावाला आकार देताना दिसले. न्यूझीलंडच्या संघाने ७ षटकात बिन बाद ३० धावा केल्या असताना रोहित शर्मानं अनुभवी फिरकीपूट आर अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आर अश्विननं आपल्या पहिल्याच टॉम  लॅथमची विकेट घेत सलामी जोडी फोडत भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले.

सलामी जोडी फोडण्यासठी अश्विननं असं विणलं जाळं
 
आर अश्विन याने चेंडू हातात आल्यावर चतुराईनं गोलंदाजी करत सेटअप करून टॉम लॅथमला आपल्या जाळ्यात अडकवलं. पहिले पाच चेंडू मिडल अँण्ड लेग स्टंपच्या आसपास टाकत त्याने टॉम लॅथमच्या विकेटसाठी जाळ विणलं. षटकाच्या शेवटचा चेंडूवर अश्विननं स्लोअर अन् टॉसअप डिलिव्हरीसह न्यूझीलंड कॅप्टनला चकवा दिला. 

अश्विननं अगदी 'बुद्धिबळातील खेळाप्रमाणेच चलाखीनं खेळली चाल 

अश्विनन टाकलेला हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेला पडला. पण  पिचिंगनंतर तो  बॅटर टॉम लॅथमपासून दूर गेला. लॅथम पुढच्या पायाने बचाव करायला गेला अन् इथंच तो जाळ्यात फसला. स्टंपसमोर सापडल्यामुळे पायचितच्या रुपात त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. बुद्धिबळाच्या खेळात जसे चतुराईनं चाल खेळली जाते. अगदी त्याच पद्धतीने अश्विनने क्रिकेटमध्ये आपली बुद्धिमता अन् चतुराई दाखवून देत टीम इंडियाला पहिल यश मिळवून दिले. 

 

Web Title: India vs New Zealand, 2nd Test Ravichandran Ashwin Traps Tom Latham With A Chess Move In The 2nd Test At Pune Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.