Join us  

Video : सामना जिंकण्यासाठी टीम इंडियानं खेळला होता रडीचा डाव, अंपायरनी दिली ताकीद अन्...

India vs New Zealand : या सामन्यात सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीच्या संघानं रडीचा डाव खेळण्याचे समोर आले आहे. अंपायरनी त्यांना ताकीदही दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 11:26 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी : न्यूझीलंड संघानं दुसऱ्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी टीम इंडियावर विजय मिळून मालिका 2-0 अशी खिशात घातली. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांनी टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. त्यानंतर टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी अर्धशतकी खेळी करताना न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण, या सामन्यात सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीच्या संघानं रडीचा डाव खेळण्याचे समोर आले आहे. अंपायरनी त्यांना ताकीदही दिली होती.

टीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थानही धोक्यात, न्यूझीलंडची गरूड भरारीकालच्या 6 बाद 90 धावांवरून आजचा खेळ सुरू करणारा भारतीय संघ 124 धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 132 धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांना खिंड लढवायची होती, परंतु तेही अपयशी ठरले. भारताच्या तळाच्या चार फलंदाजांना तिसऱ्या दिवशी केवळ 34 धावा जोडता आल्या. ट्रेंट बोल्टने चार आणि टीम साऊदीने 3 विकेट्स घेतल्या. 

टीम इंडियाला 131 धावांचा बचाव करायचा होता आणि त्यासाठी त्यांना सुरुवातीलाच किवींना धक्के देणे अपेक्षित होते. पण, लॅथम आणि ब्लंडल यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना शतकी भागीदारी केली. लॅथम आणि ब्लंडल यांनी अनुक्रमे 52 आणि 55 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत 180 गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आणि आयसीसी कसोटी क्रमवारीतही दुसरे स्थान पटकावले.

पण, या सामन्यात कोहलीनं किवी फलंदाजांचा दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. लॅथम आणि ब्लंडल फलंदाजी करत असताना यष्टिंमागून भारताच्या खेळाडूने दुसऱ्या धावेची हाक दिली. लॅथम व ब्लंडल यांनी एकच धाव घेतली. पण, पंचांनी टीम इंडियाचा हा रडिचा डाव पाहिला आणि खेळाडूंना ताकीद दिली. 

पाहा व्हिडीओ...

 

टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

मालिकेतील अपयशानंतर विराट कोहली म्हणतो; सर्वोत्तम संघाकडून पराभूत झाल्याची खंत नाही, पण... 

ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंड, पाकिस्तानला मागे टाकून न्यूझीलंडची आगेकूच

न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली

टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीपृथ्वी शॉ