भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी : भारतीय संघानं पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली. भारताचा पहिला डाव 242 धावांत गुंडाळणाऱ्या न्यूझीलंडची अवस्थाही बिकट झाली होती. न्यूझीलंडचे 5 फलंदाज 133 धावांवर माघारी परतले होते, परंतु कायले जेमिसन, कॉलीन डी ग्रँडहोम आणि नील वॅगनर या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दमवले. न्यूझीलंडनं पहिल्या डावात 235 धावा करताना टीम इंडियाला केवळ 7 धावांच्या आघाडीवर समाधान मानण्यास भाग पाडले. दुसऱ्या डावातही टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी कायम राहिली. दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 97 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं प्रेक्षकांकडे पाहून अपशब्द वापरल्याचा प्रकार घडला.
टीम इंडियाचं येरे माझ्या मागल्या... दुसऱ्या डावातही फलंदाजांची शरणागती
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी न्यूझीलंडला धक्के दिले. टॉम ब्लंडलला ( 30) उमेश यादवनं माघारी पाठवून टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सनला ( 3) जसप्रीत बुमराहनं स्वस्थात माघारी पाठवले. रॉस टेलर ( 15), हेन्री निकोल्स ( 14) यांनी मोठी खेळी साकारता आली नाही. टॉम लॅथमने 52 धावा केल्या, पण त्याला शमीनं बाद केले. न्यूझीलंडचा निम्मा संघ 133 धावांवर माघारी परतल्यानंतर टीम इंडियाला सामन्यात मजबूत पकड घेण्याची संधी होती.
पण, कॉलीन डी ग्रँडहोम ( 26), नील वॅगनर ( 21) आणि कायले जेमिसन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. वॅगनर आणि जेमिसन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. जेमिसनने 63 चेंडूंत 49 धावा केल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांत गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आलं, परंतु त्यांना 7 धावांचीच आघाडी मिळाली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने 3, रवींद्र जडेजानं 2 विकेट्स घेतल्या.
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, दुसऱ्या डावात मयांक अग्रवाल अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टनं त्याला 3 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर पृथ्वी शॉ ( 14) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. कॉलीन डी ग्रँडहोमनं टीम इंडियाचा कर्णधार विराटला ( 14) पायचीत केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळ दाखवला. पण, रहाणे ( 9) आणि पुजारा ( 24) हे दोघेही माघारी परतले. टीम इंडियानं दिवसअखेर 6 बाद 90 धावा करताना 97 धावांनी आघाडी वाढवली आहे.
न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झोडपलं, टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं
रवींद्र जडेजाचा 'Super' झेल, भले भले झाले फेल; Video
विराट कोहलीवर पाच वर्षांनी ओढावली नामुष्की; मालिकेत लाजीरवाणी कामगिरी