माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताने न्यूझीलंडवर सात विकेट्स राखत सहज मात केली. न्यूझीलंडवर मात करत भारताने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. आता यापुढे भारताला दोन्ही सामने गमवावे लागले तरी ही मालिका त्यांच्याच नावावर असेल.
न्यूझीलंडच्या 243 धावांचा पाठलाग भारताने फक्त तीन फलंदाज गमावत पूर्ण केला. रोहित शर्माने संयत फलंदाजी करताना तीन चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीने 60 धावांची खेळी साकारली. अंबाती रायुडू (नाबाद 40) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 38) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मोहम्मद शमीने भेदक मारा करत न्यूझीलंडच्या धावसंख्येला वेसण घातली. अन्य गोलंदाजांनी शमीला सुयोग्य साथ दिल्यामुळे न्यूझीलंडला अडीचशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. संघ अडचणीत सापडला असताना रॉस टेलरने