Join us  

India vs New Zealand 3rd ODI : हार्दिक पांड्या हवेत झेपावला अन् कॅप्टन कोहली खूश झाला, Video

India vs New Zealand 3rd ODI: हार्दिक पांड्याने अखेरीस भारतीय संघाकडून पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 9:03 AM

Open in App
ठळक मुद्दे हार्दिक पांड्याने अखेरीस भारतीय संघाकडून पुनरागमन केलेसामन्याच्या 17व्या षटकात टिपला अप्रतिम झेल

माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे निलबंनाच्या कारवाईचा सामना करावा लागणाऱ्या हार्दिक पांड्याने अखेरीस भारतीय संघाकडून पुनरागमन केले. त्या कार्यक्रमातील विधानामुळे त्याला आणि सलामीवीर लोकेश राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करताना हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयातील निकाल येईपर्यंत पांड्या व राहुल यांना खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पांड्याचा न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात पांड्याने कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. नाणेफेकीचा कौल विरोधात गेला असला तरी गोलंदाजांची चोख कामगिरी बजावत संघाचे पारडे भारताच्या बाजूनं झुकवलं. पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या सलामीच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीचा सामना करण्यात अपयश आले. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रा हे धावफलकावर 26 धावा असतानाच माघारी पाठवले. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी न्यूझीलंडला धक्के दिले. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी किवींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी संयमी खेळ करताला संघाचे अर्धशतक पूर्ण केले. केन व रॉस ही जोडी संयमाने खेळ करत होती आणि भारतीय गोलंदाज त्यांना अचुक गोलंदाजी करून हैराण करत होते. अखेरीस केनचा संयम सुटला आणि त्याने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळला. सामन्याच्या 17 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केनने मारलेला हा फटका मिडविकेटला उभ्या असलेल्या पांड्याने अप्रतिमरित्या टिपला आणि केनला माघारी परतावे लागले. पांड्या डाव्याबाजूला पुर्णपणे हवेत झेपावला होता. पांड्याच्या या अप्रतिम झेलमुळे केन बाद झाला आणि कोहली खुश झाला. पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याविराट कोहलीबीसीसीआय