हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचा निर्धाराने आज हॅमिल्टन येथील मैदानावर उतरणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या सामन्यात कमबॅक करून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या दोन्ही सामन्यांत खेळण्याची संधी न मिळाल्यानं फिरकीपटू कुलदीप यादवनं पार्ट टाईम प्रोफेशन निवडले. त्याच्या या प्रोफेशनवर चाहतेही खुश झाले आहेत.
भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला, परंतु दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात संघात कोणतेही बदल न करण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. जर, बदल झालाच, तर युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. गेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारतीय गोलंदाज आपला फॉर्म कायम राखण्यावर भर देतील. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी यजमानांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले होते.
या सामन्यात कुलदीप कॅमेरामनच्या भूमिकेत दिसला होता.