हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा यष्टिमागून कमाल केली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून ऐतिहासिक मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, न्यूझीलंडच्या टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो यांनी जोरदार फटकेबाजी करताना रोहितचा निर्णय चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला. या जोडीने 7.4 षटकांत 80 धावांची सलामी दिली आणि त्यांची ही भागीदारी फिरकीपटु कुलदीप यादवने संपुष्टात आणली. पण, त्याला विकेट मिळवून देण्यात धोनीचा मोलाचा वाटा होता. धोनीने सेकंदाच्या 0.099 इतक्या जलद वेगाने ही स्टम्पिंग करून किवींना पहिला धक्का दिला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs New Zealand 3rd T20 : यष्टीमागे धोनी आहे भाऊ, नको पुढे जाऊ! वाऱ्यापेक्षाही जलद स्टम्पिंग
India vs New Zealand 3rd T20 : यष्टीमागे धोनी आहे भाऊ, नको पुढे जाऊ! वाऱ्यापेक्षाही जलद स्टम्पिंग
India vs New Zealand 3rd T20: महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा यष्टिमागून कमाल केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 1:27 PM