भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला. फॉर्मात परतलेल्या रोहित शर्माची फलंदाजी पाहण्यासारखी होती. त्याला लोकेश राहुल व विराट कोहली यांच्याकडून चांगली साथ मिळाली. त्या जोरावर टीम इंडियानं 5 बाद 179 धावा उभ्या केल्या. किवींच्या मार्टीन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी सावध सुरुवात केली, परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना माघारी पाठवून सामन्यात चुरस निर्माण केली. पण, कर्णधार केन विलियम्सननं चिवट खेळ करताना सामना किवींच्या बाजूनं झुकवला. पण, मोहम्मद शमीनं सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या अव्वल गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात रोहितनं अखेरच्या दोन चेंडूवर षटकार खेचून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतानं पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत केले. टीम इंडियानं मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूनं लागला. केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताना टीम इंडिला फलंदाजीचे निमंत्रण दिले. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी वादळी खेळी करताना पहिल्या विकेटसाठी 89 धावांची सलामी दिली. हे दोघेही माघारी परतल्यानंतर टीम इंडियाच्या धावांच्या सरासरीचा वेग थोडासा संथ झाला. पण, अखेरच्या षटकांत त्याची भरपाई केली. रोहित 40 चेंडूंत 65 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 6 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. विराट व श्रेयस अय्यर यांनी किवी गोलंदाजांचा समाचार घेतला. श्रेयस 17 धावांवर माघारी परतला. बेन्नेटनं 19व्या षटकात कोहलीला बाद केले. त्यानं 27 चेंडूंत 38 धावा केल्या. भारतानं 20 षटकांत 5 बाद 179 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी संयमी सुरुवात केली. ही जोडी तोडण्यासाठी कोहलीनं पहिल्या सहा षटकांत चार गोलंदाज वापरले. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरनं टीमला पहिले यश मिळवून दिलं. त्यानं गुप्तीलला 31 धावांवर संजू सॅमसनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये किवींनी 1 बाद 51 धावा केल्या. पुढच्याच षटकात रवींद्र जडेजानं किवींना दुसरा धक्का दिला. मुन्रो ( 14) यष्टिचीत झाला. केन विलियम्सन आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांनी चौथ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. पण, शार्दूलनं 16व्या षटकात ग्रँडहोमला बाद करून ही जोडी तोडली. केननं जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार मारून किवींवरील दडपण काहीसा हलका केला. शतकाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या केनला मोहम्मद शमीनं बाद केले आणि किवींना 6 बाद 176 धावांवर समाधान मानावे लागले. शमीनं अखेरच्या तीन चेंडूवर किवींना दोन धावा करू दिल्या नाही.
सुपर ओव्हरचा थरारजसप्रीत बुमराहच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा आल्यानंतर केन विलियम्सननं पुढील दोन चेंडूवर षटकार व चौकार खेचला. त्यानंतर एक धाव घेत मार्टीन गुप्तील स्ट्राईकवर आला आणि अखेरच्या चेंडूवर त्यानं चौकार खेचून टीम इंडियासमोर विजयासाठी 18 लक्ष्य ठेवले.भारताकडून रोहित शर्मा व लोकेश राहुल फलंदाजीला आले. पहिल्याच चेंडूवर रोहित धावबाद होता होता वाचला. पहिल्या दोन चेंडूवर रोहितनं तीन धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवर लोकेशनं चौकार मारला. त्यामुळे भारताला 3 चेंडूंवर 11 धावांची गरज होते. चौथ्या चेंडूवरील एका धावेनं सामन्यातील चुसर आणखी वाढवली. रोहितनं षटकार खेचून सर्व दडपण कमी केले. 1 चेंडू 4 धावा असा सामना रंजक बनवला. रोहितनं षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला.
IND vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मानं मोडला सचिन तेंडुलकरचा unique विक्रम
IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम
IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मा दस हजारी मनसबदार; हा शिखर सर करणारा चौथा भारतीय
... तर आशिया कप खेळणार नाही, पाकच्या इशाऱ्याला बीसीसीआयचे जशासतसे उत्तर
IND Vs NZ : नवदीप सैनीसाठी शार्दूल ठाकूर त्याग करणार? आज टीम इंडियात हे अंतिम शिलेदार खेळणार?
U19WC: कामगाराच्या मुलाची कमाल, टीम इंडियाच्या विजयाच उचलला सिंहाचा वाटा
नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट