Join us

IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

टीम इंडिया पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत इथं पुढे असल्याचे दिसून येते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:51 IST

Open in App

India vs New Zealand, 3rd Test Day 2 India All Out For 263 Take 28-Run Lead : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव २६३ धावांत आटोपला आहे. शुबमन गिल  ९० (१४६) आणि पंतच्या ६० (५९) दमदार अर्धशतकानंतर वॉशिंग्टन सुंदरनं ३६ चेंडूत केलेल्या नाबाद ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात २८ धावांची अल्प आघाडी घेतली आहे.

भारतीय संघानं घेतलेली ही आघाडी अगदी छोटी असली तरी न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाने ही आघाडी घेतल्यामुळे टीम इंडिया पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत इथं पुढे असल्याचे दिसून येते. न्यूझीलंडकडून एजाज पटेल याने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. 

शुबमन गिल अन् पंतची फिफ्टी 

तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शुबमन गिल आणि रिषभ पंत या जोडीनं ४ बाद ८६ धावांवरून खेळ पुढे नेण्यास सुरुवात केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची दमदार भागीदारी रचली. सोधीनं पंतची विकेट घेत ही जोडी फोडली. तो ५९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावांची खेळी करून तंबूत परतला.

सर्फराजच्या पदरी पडला भोपळा

त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या जड्डून २५ चेंडूत १४ धावा काढत तंबूचा रस्ता धरला. सर्फराज खानला एजाज पटेलनं खातही उघडू दिल नाही. त्यानंतर एजाज पटेलनं भारताला शुबमन गिलच्या रुपात मोठा धक्का दिला. गिलनं १४६ चेंडूत ७ चौकार आणि एका चौकाराच्या मदतीने ९० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले.  अश्विन अवघ्या ६ धावंची भर घालून परतल्यावर वॉशिंग्टन सुंदरन सामन्याची सूत्रे आपल्या  हाती घेतली. त्याने काही सुंदर फचटकेही मारले. पण दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी आलेला आकाश दीपच्या रुपात भारतीय संघाने आपली शेवटची विकेट गमावली. वॉशिंग्टन सुंदरनं ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ३८ धावांची  खेळी केली.

भारतीय संघानं रनआउटच्या रुपात गमावल्या २ विकेट्स

न्यूझीलंडकडून एजाज पटेलनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मॅट हेन्री, इश सोधी आणि ग्लेन फिलिप्स यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट जमा झाली. भारतीय संघाने विराट कोहलीशिवाय आकाश दिपच्या रुपात दोन विकेट्स या रनआउटच्या रुपात गमावल्या.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडशुभमन गिलरिषभ पंतवॉशिंग्टन सुंदर