मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात माफक धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय शेर न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर सपशेल ढेर झाल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या डावात १७४ धावा करत टीम इंडियासमोर १४७ धावांचे आव्हान ठेवले आहे. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकली. भारतीय संघाच्या धावफलकावर ३० धावा लागण्याआधी अर्धा संघ तंबूत परतला होता. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान यांनी अगदी स्वस्तात आपल्या विकेट्स गमावल्या.
मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहितन ंगमावली विकेट
प्रिन्स अन् किंग दोघेही प्रत्येकी एक- एक धाव करून माघारी
भारतीय संघाच्या धावफलकावर फक्त १३ धावा असताना तो बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या शुबमन गिलकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पहिल्या डावात ९० धावांची दमदार खेळी करणारा प्रिन्सही हजेरी लावून परतला. एजाझ पटेल याने एका धावेवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तो क्लीन बोल्ड झाला. त्याच्यापाठोपाठ एजाझ पटेलनं किंग कोहलीच्या रुपात टीम इंडियाला विराट धक्का दिला. कोहलीनं फक्त एक धाव काढली. तो डॅरिल मिचेलच्या हाती झेल देऊन परतला.
यशस्वी अन् सर्फराजलाही गाठता आला नाही दुहेरी आकडा
न्यूझीलंडच्या ताफ्यातील पार्ट टाईम स्पिनर ग्लेन फिलिप्सनं यशस्वी जैस्वारलच्या रुपात आपल्या संघाला आणखी एक यश मिळून दिले. सलामीवीर जैस्वालनं १६ चेंडूचा सामना करताना फक्त ५ धावा केल्या. सर्फराज खान याने एजाझ पटेलच्या फुलटॉस चेंडूवर रचिन रविंद्रच्या हाती झेल देऊन बाद झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने २९ धावांवर आघाडीच्या पाच विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.