Join us  

Rishabh Pant ची 'फटाकेबाजी'! टीम इंडिया संकटात असताना ठोकली दमदार फिफ्टी

पहिल्या डावातही झळकावले होते विक्रमी अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 11:53 AM

Open in App

India vs New Zealand 3rd Test Day 3 Rishabh Pant Slams Fifty : वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघ १४७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आहे. अर्धा संघ तंबूत परतल्यावर रिषभ पंतनं तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक साजरे केले. भारतीय संघ संकटात सापडला असताना त्याने कसोटी कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक झळकावले. ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने त्याने या अर्धशतकी खेळीसह भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत.  पहिल्या डावातही  त्याने विक्रमी अर्धशतक झळकावले होते.  

पंतच्या खेळीमुळे विजया आस कायम

फिरकीसाठी अनुकूल असलेल्या मुंबईच्या वानखेडेच्या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाचा दुसरा डाव १७४ धावांत आटोपला. भारतीय संघासमोर किवी संघाने १४७ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने आघाडीच्या ६ विकेट्स गमावल्या आहेत. मालिका आधीच गमावल्यानंतर टीम इंडियावर घरच्या मैदानात पाहुण्या संघाकडून व्हाइट वॉश होण्याची टांगती तलवार लटकत असताना पंतनं आपल्या तोऱ्यात तुफान फटकेबाजी करत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

वानखेडेच्या मैदानात पंत विरुद्ध एजाझ पटेल अशी रंगत

भारतीय संघाने अवघ्या २९ धावांत पहिल्या ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेला जड्डूसोबत पंतनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पण जड्डूनंही त्याची साथ सोडली. रोहित शर्माच्या ११ धावा वगळता आघाडीच्या ६ फलंदाजांमध्ये एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दुसरीकडे पंतनं एकट्यानं फिफ्टी प्लस धावा करत टीम इंडियाला मॅचमध्ये कायम ठेवले आहे. तिसऱ्या सामन्यात पंत विरुद्ध एजाझ पटेल अशी लढाई सुरु असून पंत भारी ठरताना दिसतो आहे. 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड