India vs New Zealand, 3rd Test NZ 235 all out Ravindra Jadeja picks fifer : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघाला मालिकेत पहिल्यादाच अडीचशे धावांच्या रोखले आहे. रवींद्र जाडेजाच्या फिरकीतील जादू आणि वॉशिंग्टनच्या सुंदर गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला. जड्डूनं १४ व्या वेळी पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा खास पराक्रम करून दाखवला. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन सुंदरनं ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय आकाश दीपनं एक विकेट्स घेतली.
आधी आकाश दीपचा जलवा, मग वॉशिंग्ट सुंदरनं केली हवा
मुंबईच्या मैदानात नाणेफेक जिंकून टॉम लॅथमनं पहिल्यांदा फलंदाजीची निर्णय घेतला होता. डेवॉन कॉन्वेसह कॅप्टननं संघाच्या डावाची सुरुवात केली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील चौथ्या षटकात संघाच्या धावफलकावर अवघ्या १५ धावा असताना आकाश दीपनं पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. डेवॉन कॉन्वे ११ चेंडूत ४ धावा करून पायचित होऊन तंबूत परतला. सेट होत असलेल्या टॉम लॅथमच्या रुपात वॉशिंग्टन सुंदरनं टीम इंडियाला दुसरं यश मिळवून दिले. न्यूझीलंडचा कॅप्टन ४४ चेंडूत ४२८ धावा करून चालता झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या रचिन रविंद्रलाहा वॉशिंग्टन सुंदरनं चकवा दिला. तो फक्त ५ धावा करून बाद झाला.
न्यूझीलंडच्या ताफ्यातील दोघांच्या अर्धशतकावर भारी पडला जड्डूचा 'पंजा'
अवघ्या ७२ धावांवर न्यूझीलंडच्या संघाने आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना विल यंग आणि डॅरिल मिचेल या जोडीनं चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागादीर रचत डाव सावरला. सेट झालेली ही जोडी फोडत जड्डूनं आपल्या विकेट्सच खातं उघडलं. जड्डूनं एकाच षटकात विल यंग ७१ (१३८) आणि टॉम ब्लंडेल याला खातेही न उघडता माघारी धाडले. ठराविक अंतराने न्यूझीलंड्सच्या विकेट्स पडत असताना डॅरिल मिचेलनं १२९ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून आलेल्या दोन अर्धशतकावर भारतीय फिरकीपटू भारी ठरले. जाडेजानं १४ वेळी ५ विकेट्स हॉलला गवसणी घातली. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर पुणे कसोटी सामन्यानंतर पुन्हा चमकला.
Web Title: India vs New Zealand, 3rd Test NZ 235 all out Ravindra Jadeja picks fifer, Washington Sundar gets four wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.