मुंबई कसोटी सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने कमालीची गोलंदाजी केली. सुंदर गोलंदाजीशिवाय न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात आपल्या ताफ्यातील अन्य सहकारी खेळाडूंची जर्सी घालून तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. ही गोष्ट सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे. वॉशिंग्टन सुंदरवर अशी वेळ का आली? असा प्रश्नही अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट
वॉशिंग्टन सुंदरनं या खेळाडूंची जर्सी घालून वेधलं लक्ष
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर सुरुवातीला आपली स्वत:ची जर्सी घालूनच मैदानात उतरला होता. पण काही वेळानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांची जर्सी घातल्याचे स्पॉट झाले. अक्षर पटेल आणि ध्रुव जुरेल यांची जर्सी घालून तो खेळताना दिसला. हे दोन्ही खेळाडू न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासोबत आहेत. पण त्यांना एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही. आता प्रश्न उरता हा की, ही वेळ त्याच्यावर का आली?
या कारणामुळे सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळताना दिसला वॉशिंग्टन
मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात सुरु असलेल्या मैदानात कडाक्याच्या उन्हानं खेळाडूंना हैराण करुन सोडलं. न्यूझीलंडच्या फलंदाजांसह गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणारे भारतीय ताफ्यातील खेळाडूंची जर्सीही घामाने भिजून गेल्याचे पाहायला मिळाले. याच कारणामुळे वॉशिंग्टन सुंदरला बदली जर्सीच्या रुपात सहकाऱ्यांची जर्सी घालावी लागली. त्याला इतका घाम येत होता की, तो ठराविक वेळांनी जर्सी बदलून खेळताना दिसून आले. उष्ण वातावरणामुळे न्यूझीलंडच्या पहिल्या डावात अनेक वेळा खेळाडू ड्रिंक्स ब्रेक घेतानाही दिसून आले.
वॉशिंग्टनची सुंदर गोलंदाजी, चाार विकेट्स घेत पुन्हा दाखवली आपल्या फिरकीतील जादू
मुंबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला. यात वॉशिंग्टन सुंदरनंही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वॉशिंग्टन सुंदरनं १८.४ षटके गोलंदाजी करताना २ निर्धाव षटके टाकताना ८१ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या. पुण्याच्या मैदानात दमदार कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने कमालीची कामगिरी करून दाखवली आहे.
Web Title: India vs New Zealand, 3rd Test Washinton Sundar wears Dhruv Jurel, Axar Patel's jerseys during match vs New Zealand. Here's the reason
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.