Yashasvi Jaiswal Eyes On World Record Most Sixes : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ, 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर बॅटर यशस्वी जैस्वाल याला वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी आहे.
यशस्वीच्या निशाण्यावर आहे ब्रेन्डन मॅक्युलमचा रेकॉर्ड
मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात यशस्वी जैस्वाल याला ब्रेन्डन मॅक्युलमचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडित काढण्याची संधी आहे. न्यूझीलंडच्या या स्फोटक फलंदाजाच्या नावे कसोटीत एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. २०१४ मध्ये त्याने ३३ षटकारांसह हा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला होता. जो दशकभरापासून अबाधित आहे.
फक्त २ षटकार अन् भारतीय युवा सलामीवीर होईल नवा सिक्सर किंग
यशस्वी जैस्वालच्या भात्यातून यंदाच्या वर्षात आतापर्यंत ३२ षटकार पाहायला मिळाले आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात २ षटकारासह दहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढत तो कसोटीतील नवा सिक्सर किंग होऊ शकतो.
कसोटीत एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज (Batsmen who hit the most sixes in Tests in a calendar year)
- ३३ - ब्रेन्डन मॅक्लुलम (२०१४)
- ३२ - यशस्वी जैस्वाल (२०२४)*
- २६ - बेन स्टोक्स (२०२२)
- २२ - अॅडम गिलख्रिस्ट (२००५)
- २२ - वीरेंद्र सेहवाग (२००८)
यशस्वीची न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील कामगिरी
न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या बंगळुरु कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. पहिल्या डावात त्याने ६३ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने फक्त १३ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात ५२ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने त्याने ३५ धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याच्या भात्यातून एकही षटकार पाहायला मिळला नव्हता. पुण्याच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६० चेंडूत ३० धावांची खेळी केली. त्याची ही खेळीही षटकाराशिवायच होती. पण दुसऱ्या डावात त्याने धमाकेदार खेळ करुन दाखवला. ६५ चेंडूत त्याने ७७ धावांची दमदार खेळी केली. त्याची ही खेळी ९ चौकारांसह ३ षटकाराने बहरलेली होती.
Web Title: India vs New Zealand, 3rd Test Yashasvi Jaiswal Eyes On World Record Most Sixes By A Batter In Mens Tests In A Calendar Year At Wankhede Stadium Mumbai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.