India vs New Zealand 5th ODI : विजयानंतर भारतीय संघाने म्हटला उरी चित्रपटातील 'हा' डायलॉग

सध्याच्या घडीला उरी सिनेमा हा चांगलाच गाजत आहे. भारतीय संघालाही या सिनेमाने मोहित केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:46 PM2019-02-03T17:46:17+5:302019-02-03T17:47:26+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 5th ODI: After winning, the Indian team called Dialogue of URI film | India vs New Zealand 5th ODI : विजयानंतर भारतीय संघाने म्हटला उरी चित्रपटातील 'हा' डायलॉग

India vs New Zealand 5th ODI : विजयानंतर भारतीय संघाने म्हटला उरी चित्रपटातील 'हा' डायलॉग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ हा बॉलीवूडच्या सिनेमांचा चाहता आहे. देशाभिमानावर जर एखादा सिनेमा असेल तर भारतीय संघ तो आवर्जुन बघतो. सध्याच्या घडीला उरी सिनेमा हा चांगलाच गाजत आहे. भारतीय संघालाही या सिनेमाने मोहित केले. त्यामुळेच  भारतीय संघाने जेव्हा जेतेपदाचा चषक पटकावला तेव्हा त्यांनी  उरी चित्रपटातील खास डायलॉग म्हटला.

उरी सिनेमामध्ये 'HOWS THE JOSH'... "HIGH SIR" असा डॉयलॉग आहे. भारतीय संघाने विजयानंतर हाच डॉयलॉग म्हणत आपला आनंद साजरा केला.

हा पाहा खास व्हिडीओ

रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.  रायुडूने दमदार 90 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताना 252 धावा करता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्याचा रायुडू हाच सर्वोत्तम खेळाडू ठरला.

रायुडूला यावेळी चांगली साथ दिली ती विजय शंकरने. रायुडू आणि शंकर यांची जोडी चांगलीच रंगली. पण रायुडूच्या एका चुकीमुळे शंकरचे अर्धशतक हुकल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच रायुडू हा टीकेचा धनी ठरत आहे. चोरटी धाव घेण्याच्या नादात रायुडू आणि शंकर यांच्यामध्ये योग्य समन्वय होऊ शकला नाही. त्यामध्ये शंकरचा बळी गेला. त्यावेळी शंकर 45 धावांवर होता. जर शंकर बाद झाला नसता तर त्याला आपले पहिले अर्धशतक झळकावता आले असते. त्यामुळेच सोशल मीडियावर रायुडूला चाहत्यांनी धारेवर धरले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. रोहितच्या नेतृत्वावर साऱ्यांनी स्तुतीसुमनांचा वर्षाव केला खरा, पण रोहितच्या शतकी एक्सप्रेसला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले.

रोहित शर्माला पाचव्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. तो 2 धावांवर बाद झाला. चौथ्या सामन्यातही रोहितला सात धावा करता आल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात रोहितने अनुक्रमे 62 आणि 87 धावा केल्या. पहिल्या सामन्यात रोहितला 11 धावा करता आल्या होत्या. 

रोहितने 2107 साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर सलग दहा मालिकांमध्ये शतक झळकावले होते. पण न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत मात्र त्याला शतकाने हुलकावणी दिली. त्यामुळे रोहितच्या शतकी एक्सप्रेसला ब्रेक लागल्याचे म्हटले गेले.

आतापर्यंत सलग मालिकांमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम रोहितच्याच नावावर आहे. या यादीमध्ये दुसरा क्रमांक विराट कोहली आणि हशिम अमला यांच्यामध्ये विभागला गेला आहे. या दोघांनी सलग सहा मालिकांमध्ये शतक झळकावले होते. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सलग पाच मालिकांमध्ये शतक झळकावले होते.

रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.  रायुडूने दमदार 90 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताना 252 धावा करता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्याचा रायुडू हाच सर्वोत्तम खेळाडू ठरला.

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण त्यांची 4 बाद 18 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर रायुडूने 8 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 90 धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी प्रत्येक 45 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताला 252 धावा करता आल्या.

रायुडूला यावेळी चांगली साथ दिली ती विजय शंकरने. रायुडू आणि शंकर यांची जोडी चांगलीच रंगली. पण रायुडूच्या एका चुकीमुळे शंकरचे अर्धशतक हुकल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच रायुडू हा टीकेचा धनी ठरत आहे. चोरटी धाव घेण्याच्या नादात रायुडू आणि शंकर यांच्यामध्ये योग्य समन्वय होऊ शकला नाही. त्यामध्ये शंकरचा बळी गेला. त्यावेळी शंकर 45 धावांवर होता. जर शंकर बाद झाला नसता तर त्याला आपले पहिले अर्धशतक झळकावता आले असते. त्यामुळेच सोशल मीडियावर रायुडूला चाहत्यांनी धारेवर धरले आहे.

Web Title: India vs New Zealand 5th ODI: After winning, the Indian team called Dialogue of URI film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.