वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : अंबाती रायुडूने दमदार 90 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताना 252 धावा करता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्याचा रायुडू हाच सर्वोत्तम खेळाडू ठरला. पण सामनावीर होऊनही रायुडूहा सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरत आहे, अशी कोणती चूक रायुडूकडून झाली ते जाणून घ्या...
रायुडूला यावेळी चांगली साथ दिली ती विजय शंकरने. रायुडू आणि शंकर यांची जोडी चांगलीच रंगली. पण रायुडूच्या एका चुकीमुळे शंकरचे अर्धशतक हुकल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच रायुडू हा टीकेचा धनी ठरत आहे. चोरटी धाव घेण्याच्या नादात रायुडू आणि शंकर यांच्यामध्ये योग्य समन्वय होऊ शकला नाही. त्यामध्ये शंकरचा बळी गेला. त्यावेळी शंकर 45 धावांवर होता. जर शंकर बाद झाला नसता तर त्याला आपले पहिले अर्धशतक झळकावता आले असते. त्यामुळेच सोशल मीडियावर रायुडूला चाहत्यांनी धारेवर धरले आहे.
रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण त्यांची 4 बाद 18 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर रायुडूने 8 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 90 धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी प्रत्येक 45 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताला 252 धावा करता आल्या.
पाचव्या सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये फारशी चुणूक दाखवता आली नाही. पण यष्टीरक्षण करताना मात्र त्याने अद्भूत अशीच कामगिरी केली. भारतीय संघ पुन्हा एकदा अचडणीत सापडला असताना कर्णधार रोहित शर्माने केदार जाधवला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केले. केदारने 37व्या षटकात जेम्स निशामच्या विरोधात पायचीतचे अपील केले. यावेळी पंचांनी हे अपील फेटाळले. धोनीनेही सुरुवातीला अपील केले खरे, पण त्यानंतर तो चेंडू घेण्यासाठी धावला. धोनी चेंडूपर्यंत पोहोचत असताना न्यूझीलंडचे फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी धोनीने चतुराई दाखवली आणि चपळतेने चेंडू थेट यष्ट्यांवर फेकला. धोनीने नेमके काय आणि कसे केले हे कुणालाही कळले नाही. अखेर तिसऱ्या पंचांना विचारणे करण्यात आली आणि धोनीने निशामला रन आऊट केल्याचा निर्णय दिल्या.
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये आज पाचवा एकदिवसीय सामना सुरु आहे. वेलिंग्टन येथील पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडला 253 धावांचं आव्हान दिले आहे. सामन्यात अंबाती रायडु, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर या खेळाडूंनी शानदार खेळी खेळली. अंबाती रायडू आणि विजय शंकरनं पार्टनरशिपमध्ये 98 धावा तर केदार जाधवच्या पार्टनरशिपमध्ये 74 धावा केल्या. शेवटी आलेल्या हार्दिकनं 5 षटकार लगावत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अंबाती रायडुनं सर्वाधिक 90 धावा केल्या तर हार्दिक पंड्या विजय शंकरने प्रत्येकी 45-45 धावांचे योगदान दिले.