India vs New Zealand 5th ODI : ... आणि पुन्हा एकदा गब्बरने मांडी थोपटली

पाचव्या एकदिवसीय सामन्यातही गब्बरने मांडी थोपटली आणि चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 02:19 PM2019-02-03T14:19:12+5:302019-02-03T14:19:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 5th ODI: ... and once again Shikhar Dhawan done celebration | India vs New Zealand 5th ODI : ... आणि पुन्हा एकदा गब्बरने मांडी थोपटली

India vs New Zealand 5th ODI : ... आणि पुन्हा एकदा गब्बरने मांडी थोपटली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : प्रत्येकाची सेलिब्रशेन करण्याची वेगवेगळी पद्धत असते, मग ते कोणताही मैदान असो. भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनचीही सेलिब्रेशनची एक खास स्टाइल आहे आणि ही स्टाइल भारताच्या चाहत्यांना चांगलीच भावते. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यातही गब्बरने मांडी थोपटली आणि चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला.

भारताच्या 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दमदार फलंदाजी करत होता. जर केन टिकला तर तो सामना जिंकवू शकतो, हे भारतीय संघाला माहिती होते. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीमध्ये बदल केला आणि केदार जाधवच्या हाती चेंडू सुपूर्द केला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदारला अशा काही टिप्स दिल्या की, केनला तंबूचा रस्ता धरावा लागला. यावेळी केनचा झेल पकडला तो गब्बरनेच आणि त्यानंतर आपली मांडी थोपटत त्याने सेलिब्रेशन केले.


 भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये आज पाचवा एकदिवसीय सामना सुरु आहे. वेलिंग्टन येथील पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडला 253 धावांचं आव्हान दिले आहे.  सामन्यात अंबाती रायडु, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर या खेळाडूंनी शानदार खेळी खेळली. अंबाती रायडू आणि विजय शंकरनं पार्टनरशिपमध्ये 98 धावा तर केदार जाधवच्या पार्टनरशिपमध्ये 74 धावा केल्या. शेवटी आलेल्या हार्दिकनं 5 षटकार लगावत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अंबाती रायडुनं सर्वाधिक 90 धावा केल्या तर हार्दिक पंड्या विजय शंकरने प्रत्येकी 45-45 धावांचे योगदान दिले.

Web Title: India vs New Zealand 5th ODI: ... and once again Shikhar Dhawan done celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.