वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताच्या 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दमदार फलंदाजी करत होता. जर केन टिकला तर तो सामना जिंकवू शकतो, हे भारतीय संघाला माहिती होते. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीमध्ये बदल केला आणि केदार जाधवच्या हाती चेंडू सुपूर्द केला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदारला अशा काही टिप्स दिल्या की, केनला तंबूचा रस्ता धरावा लागला.
केदारची गोलंदाजी चांगली होत होती. तो केनला चांगलाच चकवत होता. त्यामुळे केन एक मोठा फटका मारणार, असे धोनीला वाटले. त्यामुळे त्याने केदारला काही टिप्स दिल्या. केदारनेही धोनीच्या टिप्स ऐकल्या आणि तशीच गोलंदाजी केली. केदारच्या 26व्या षटकात केनने मोठा फटका मारला आणि चेंडू थेट शिखर धवनच्या हातात विसावला. पुन्हा एकदा धोनीच्या टिप्समुळे सामन्याला कलाटणी मिळाल्याचे पाहायला मिळाले.
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये आज पाचवा एकदिवसीय सामना सुरु आहे. वेलिंग्टन येथील पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडला 253 धावांचं आव्हान दिले आहे. सामन्यात अंबाती रायडु, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर या खेळाडूंनी शानदार खेळी खेळली. अंबाती रायडू आणि विजय शंकरनं पार्टनरशिपमध्ये 98 धावा तर केदार जाधवच्या पार्टनरशिपमध्ये 74 धावा केल्या. शेवटी आलेल्या हार्दिकनं 5 षटकार लगावत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अंबाती रायडुनं सर्वाधिक 90 धावा केल्या तर हार्दिक पंड्या विजय शंकरने प्रत्येकी 45-45 धावांचे योगदान दिले.
Web Title: India vs New Zealand 5th ODI: India get wicket once again with ms Dhoni's tips
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.