Join us  

India's lowest score in Test cricket : परदेशात ३६ चा आकडा; मायदेशात किवींनी काढला फलंदाजीतील जीव

इथं एक नजर टाकुयात कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघावर कमी धावांत आटोपण्याची नामुष्की कधी कधी अन् कुणाविरुद्ध ओढावलीये त्या रेकॉर्ड्सवर    

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 2:50 PM

Open in App

India's lowest score in Test cricket history at home And overseas : न्यूझीलंडच्या संघाने बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात इतिहास रचला आहे. भारतीय मैदानात आतापर्यंत  एकही कसोटी मालिका न जिंकलेल्या किवी संघाने भारतीय फलंदाजीतील जीव काढून घेतला. बंगळुरु कसोटीतील दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला अवघ्या ४६ धावांत आटोपले. 

मायदेशात किवींनी काढला फलंदाजीतील जीव

बंगळुरुच्या मैदानात किवी संघातील गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीतील जीव काढला. ४६ धावांवर गुंडाळल्यामुळे टीम इंडियाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.  घरच्या मैदानातील कसोटी सामन्यातील भारतीय संघाची ही निच्चांकी धावसंख्या आहे. याआधी वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ७५ धावांत ऑल आउट झाल्याचे पाहायला मिळाले होते.  आतापर्यंतच्या कसोटी इतिहासातील भारताची ही तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या आहे.  इथं एक नजर टाकुयात कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघावर कमी धावांत आटोपण्याची नामुष्की कधी कधी अन् कुणाविरुद्ध ओढावलीये त्या रेकॉर्ड्सवर    

भारतीय संघाचा घरच्या मैदानातील कसोटीतील निच्चांकी धावसंख्या (India's lowest score in Test cricket history at home)

 

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- ३१.२ षटकात ४६ धावा, बंगळुरु (१७ ऑक्टोबर २०२४) 
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ३०.५ षटकात ७५ धावा, दिल्ली, (२५ नोव्हेंबर १९८७)
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २० षटकात  ७६ धावा, अहमदाबाद (३ एप्रिल २००८)
  • भारत विरुद्ध इंग्लंड ३८.५ षटकात ८३ धावा, चेन्नई (१४ जानेवारी१९७७)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड २७ षटकात ८३ धावा, मोहाली (१० ऑक्टोबर १९९९)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड ५४.२ षटकात ८९ धावा, हैदराबाद (डेक्कन)  (१५ ऑक्टोबर १९६९) 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय संघाची निच्चांकी धावसंख्या (Lowest score by India in Test cricket history)

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २१.२ षटकात ३६ धावा, अ‍ॅडलेड (१७ डिसेंबर २०२०)
  • भारत विरुद्ध इंग्लंड १७ षटकात ४२ धावा, लॉर्ड्स (२० जून १९७४)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड ३१.२ षटकात ४६ धावा, बंगळुरु (१७ ऑक्टोबर २०२४)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  २१.३ षटकात ५८ धावा, ब्रिस्बेन (२८ नोव्हेंबर १९४७)
  • भारत विरुद्ध इंग्लंड २१.४ षटकात ५८ धावा, मँचेस्टर (१७ जुलै १९५२)
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ३४.१ षटकात ६६ धावा, डरबन (२६ डिसेंबर १९९६)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया२४.२ षटकात ६७ धावा मेलबर्न (६ फेब्रुवारी १९४८) 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडरोहित शर्माविराट कोहली