Join us  

याला काय अर्थ! गौतम गंभीर विजयानंतरही कॅप्टन हार्दिक पांड्यावर खवळला, युझवेंद्र चहलबाबत म्हणाला... 

India vs New Zealand: Gautam Gambhir  On Hardik Pandya: भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६  विकेट्सने विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 4:30 PM

Open in App

India vs New Zealand: Gautam Gambhir  On Hardik Pandya: भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६  विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. भारतीय फिरकीपटूमुळे किवी संघाला २० षटकांत केवळ ९९ धावाच करता आल्या. विजयानंतर माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर हा कर्णधार हार्दिक पांड्यावर रागावला. यामागे त्यांनी मोठे कारणही दिले आहे. 

भारतीय संघाच्या विजयानंतर गौतम गंभीर संतापलेला दिसला. ''युझवेंद्र चहलला दोनच षटके दिल्याने तो संतापला होता. तो म्हणाला, 'चहल ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये तुमचा नंबर वन स्पिनर आहे. तू त्याला फक्त दोन षटके टाकायला दिली आणि त्याने फिन ऍलनची विकेट घेतली. त्याचा चार षटकांचा कोटा पूर्ण केला नाही आणि त्याला काही अर्थ नाही.''  

पुढे बोलताना गौतम गंभीर म्हणाला, ''तुम्हाला अर्शदीप सिंग आणि शिवम मावीसारख्या खेळाडूंना संधी द्यायची होती. पण तुम्ही युझवेंद्र चहलला १९वे किंवा २० षटक टाकायला देऊ शकला असता.'' चहलने न्यूझीलंडविरुद्ध विकेट घेत मोठा विक्रम केला. तो ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने भारताकडून ट्वेंटी-२०त आतापर्यंत ९१ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात युझवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या दोन षटकांत केवळ ४ धावा दिल्या आणि एक बळी मिळवला. 

भारतीय संघाने  दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताने न्यूझीलंडला ९९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.  युझवेंद्र, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या व दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांचीही कोंडी झाली होती. न्यूझीलंडने १०० धावांच्या लक्ष्यासाठी भारताला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले होते. भारताने १९.५ षटकांत ४ बाद १०१ धावा करून सामना जिंकला. सूर्या २६, तर हार्दिक १५ धावांवर नाबाद राहिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्यागौतम गंभीरयुजवेंद्र चहल
Open in App