भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला तिसरा व अखेरच्या वन डे सामना मंगळवारी होणार आहे. न्यूझीलंड संघानं पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे त्यांच्यादृष्टीनं उद्या होणारा सामना हा केवळ औपचारिक आहे. या मालिकेत न्यूझीलंड संघाला दुखापतीनं घेरलेलं पाहायला मिळालं. कर्णधार केन विलियम्सननं खांद्याच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन वन डेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी न्यूझीलंड संघानं अखेरच्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. त्यात केनही पूर्णपणे बरा झाला असून उद्याच्या सामन्यात तो नेतृत्व सांभाळणार आहे.
न्यूझीलंडनं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य चार विकेट्स राखून पार केले. रॉस टेलरच्या शतकी खेळीनं किवींना मालिकेत आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यातही रॉस टेरलची बॅट तळपली. त्याला मार्टीन गुप्तीलचीही साथ लाभली. न्यूझीलंडच्या 273 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 251 धावांवर गडगडला. किवींनी 22 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं ईश सोढी व ब्लेअर टिकनर यांचा समावेश केला आहे. भारत अ विरुद्धच्या सामन्यात सोढी व टिकनर यांचा न्यूझीलंड अ संघात समावेश होता. मिचेल सँटरन व टीम साउदी यांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे आणि स्कॉट कुग्गेलेइजनला ताप आला आहे. स्कॉट अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्यामुळे त्याच्या खेळण्यावर अनिश्चितता आहे. सँटनर आणि स्कॉट हे दुसऱ्या सामन्यातही खेळले नव्हते. साउदी आजारी असूनही सामन्यात खेळला होता आणि विराट कोहलीची विकेटही घेतली होती.
Web Title: India vs New Zealand: Kane Williamson is on track to lead the side out tomorrow; Ish Sodhi, Blair Tickner join NZ squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.