India vs New Zealand : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. टीम इंडियानं काही सीनियर खेळाडूंना विश्रांती देताना ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा टीम इंडियाचा नवा कर्णधार असणार आहे, तर राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकाचा जबाबदारीत दिसणार आहे. न्यूझीलंडच्या संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना उपविजेतेपद पटकावले. १४ नोव्हेंबरला फायनल झाल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू सोमवारी भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. पण, कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) हा भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं ( NZC) स्पष्ट केलं.
न्यूझीलंडचा संघ या दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. १७ नोव्हेंबरपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. केननं कसोटी मालिकेला प्राधान्य देताना एक आठवड्याची विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे तो ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही. २५ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. केनच्या अनुपस्थितीत टीम साऊदी न्यूझीलंडचे नेतृत्व सांभाळणार आहे. ( Tim Southee will lead New Zealand). दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेणाऱ्या ल्युकी फर्ग्युसनचे कमबॅक झाले आहे.
न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० संघ - मार्टीन गुप्तील, डॅरील मिचेल, ग्लेन फिलिप्स, टीम सेईफर्ट, मार्क चॅपमॅन, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, कायले जेमिन्सन, इश सोढी, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
India vs New Zealand Schedule 2021
पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१, जयपूर
दूसरा ट्वेंटी-२० - १९ नोव्हेंबर, २०२१, रांची
तिसरा ट्वेंटी-२० - २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता
Web Title: India vs New Zealand : Kane Williamson will miss the T20I series against India in order to prepare for the Test series that follows
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.