भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं सुरेख सांघिक खेळ केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं सात विकेट राखून हा सामना जिंकला. राहुलनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह टीम इंडियानं पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी मजबूत आघाडी घेतली आहे. या सामन्यात अर्धशतकी खेळी करून लोकेश राहुलनं इतिहास घडवला.
न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी न्यूझीलंडला दमदार सुरूवात करून दिली. सहाव्या षटकात शार्दूल ठाकूरनं किवीच्या गुप्तीलला बाद केले. गुप्तील 20 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 33 धावांवर माघारी परतला. सामन्याच्या नवव्या षटकात न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला. शिवम दुबेनं मुन्रोला बाद केले. 26 धावा करणाऱ्या मुन्रोचा कर्णधार कोहलीनं सुपर झेल टीपला. त्यानंतर 11व्या षटकात रवींद्र जडेजानं किवींना धक्के दिले. जडेजानं 4 षटकांत 18 धावा देत दोन विकेट घेतल्या. किवींना 20 षटकांत 5 बाद 132 धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( 8) पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. टीम साऊदीनं त्याला रॉस टेलरकरवी झेलबाद केले. लोकेश राहुल व विराट कोहलीनं टीम इंडियाचा डाव सावरला, परंतु पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात टीम साऊदीनं आणखी एक धक्का दिला. त्यानं कोहलीला यष्टिरक्षक सेइफर्टकरवी झेलबाद केले. कोहली 11 धावाच करून माघारी परतला. पण, त्यानंतर लोकेशनं श्रेयस अय्यरच्या साथीनं टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी संयमी खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. लोकेशनं आणखी एक अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. श्रेयस अय्यर 33चेंडूंत 1 चौकार व 3 षटकार खेचून 44 धावांवर माघारी परतला. लोकेश राहुल 50 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 57 धावांवर नाबाद राहिला.
मागील पाच ट्वेंटी-20 सामन्यांत लोकेशनं 91, 45, 54, 56, 57* धावा केल्या आहेत. लोकेशकडे या मालिकेत कर्णधार कोहलीनं यष्टिरक्षकाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आणि त्यातही तो यशस्वी झाला. पण, यष्टिरक्षक म्हणून पहिल्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांत अर्धशतक झळकावणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. त्यानं पहिल्या ट्वेंटी-20त 56 धावा केल्या होत्या.
IND Vs NZ, 2nd T20I: विराट कोहलीचा 'सुपर' झेल, मोडला रोहित शर्माचा विक्रम
थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, न्यूझीलंडनं जिंकली मालिका
BCCIला इशारा देणाऱ्या पाकिस्तानचे घुमजाव; आता विचारतात असं कधी म्हणालो?
लै भारी... ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाची ट्वेंटी-20त 130 धावांची वादळी खेळी
देशातल्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचा शंभरावा वाढदिवस, सचिन तेंडुलकरनं घेतली खास भेट
IND Vs NZ, 2nd T20I: ...अन् विराट कोहलीवर आली तोंड लपवण्याची वेळ
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी युवराज सिंग, वासीम अक्रम एकत्र खेळणार!
खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय?
Web Title: India Vs New Zealand : KL Rahul is now the 1st player to score fifties in first two matches as a wicketkeeper in the history of T20I cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.