India vs New Zealand : भारताचा पुरूष व महिला क्रिकेट संघ एकाच वेळी न्यूझीलंड दौ-यावर 

India vs New Zealand: भारताचा पुरूष व महिला क्रिकेट संघ पुढील वर्षी न्यूझीलंड दौ-यावर जाणार आहे. दोन्ही संघ जानेवारी महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंडमध्ये दाखल होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 02:12 PM2018-07-31T14:12:59+5:302018-07-31T14:43:37+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand: Men and women's cricket team of India on New Zealand tour at the same time | India vs New Zealand : भारताचा पुरूष व महिला क्रिकेट संघ एकाच वेळी न्यूझीलंड दौ-यावर 

India vs New Zealand : भारताचा पुरूष व महिला क्रिकेट संघ एकाच वेळी न्यूझीलंड दौ-यावर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारताचा पुरूष व महिला क्रिकेट संघ पुढील वर्षी न्यूझीलंड दौ-यावर जाणार आहे. दोन्ही संघ जानेवारी महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंडमध्ये दाखल होणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाच वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत. महिला संघ येथे तीन वन डे व तीन टी-20 सामने खेळतील.

ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना होणार आहे. नेपीयर येथे 23 जानेवारीला पहिला वन डे सामना खेळला जाईल, तर अन्य लढती मॅट मौंगनूई आणि हॅमिल्टन येथे खेळवल्या जातील. टी-20 सामने वेलिंग्टन, ऑकलंड आणि हॅमिल्टन येथे होतील.


महिलांचाही पहिला वन डे सामना नेपीयर येथे 24 जानेवारीला होणार आहे.  न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत साइटवर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरूद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर भारताविरूद्धची मालिका होणार असून त्यापाठोपाठ बांगलादेशविरूद्ध तीन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहेत.  



 

भारताचा 2019 चा न्यूझीलंड दौरा 
पुरूष - 

23 जानेवारी - पहिली वन डे ( नेपीयर)
26 जानेवारी -  दुसरी वन डे ( मॅट मौंगनूई)
28 जानेवारी - तिसरी वन डे ( मॅट मौंगनूई )
31 जानेवारी - चौथी वन डे ( हॅमिल्टन)
3 फेब्रुवारी - पाचवी वन डे ( वेलिंग्टन )
6 फेब्रुवारी - पहिली टी-20 ( वेलिंग्टन)
8 फेब्रुवारी - दुसरी टी-20 ( ऑकलंड)
10 फेब्रुवारी - तिसरी टी-20 ( हॅमिल्टन)
महिला
 24 जानेवारी - पहिली वन डे ( नेपीयर)
29 जानेवारी - दुसरी वन डे (मॅट मौंगनूई )
1 फेब्रुवारी - तिसरी वन डे ( हॅमिल्टन)
6 फेब्रुवारी - पहिली टी-20 ( वेलिंग्टन )
8 फेब्रुवारी - दुसरी टी-20 ( ऑकलंड )
10 फेब्रुवारी - तिसरी टी-20 ( हॅमिल्टन )
 

Web Title: India vs New Zealand: Men and women's cricket team of India on New Zealand tour at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.