हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागले होते. स्नायू दुखावल्यामुळे धोनीला हा सामना खेळता आला नव्हता. पण धोनी आता पूर्णपणे फिट झाला असून त्याने चौथ्या सामन्यासाठी चांगलाच सराव केला.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीच्या उपस्थितीत दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले होते. भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला. या सामन्यातील विजयासह भारताने न्यूझालंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली होती.
चांगल्या फॉर्मात असलेल्या महेंद्रसिंग धोनीला दुखातपीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्याला मुकावे लागले. ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेत सलग तीन अर्धशतक करणाऱ्या धोनीने न्यूझीलंडमध्येही साततत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फलंदाजीप्रमाणे यष्टिमागील कामगिरीमुळे धोनी चर्चेत होता. त्याशिवाय तो गोलंदाजांना करत असलेल्या मार्गदर्शनाचा संघाच्या विजयात किती फायदा झाला हे सर्वांनी पाहिले. मात्र, त्याच्या मांडीचे स्नायू ताणल्यामुळे त्याला तिसऱ्या वन डेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
दुखापत किंवा आजरपणामुळे संघाबाहेर बसण्याची धोनीची ही तिसरीच वेळ आहे. यापूर्वी तो 2013 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यात दुखापतीमुळे आणि 2007 मध्ये तापामुळे संघाबाहेर बसला होता.
हॅमिल्टनचा इतिहास भारताच्या विरोधातहॅमिल्टन येथे भारतीय संघाने 1981 साली पहिला सामना खेळला होता, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. या स्टेडियमवर विजय मिळवण्यासाठी 2009 साल उजाडले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हॅमिल्टनवर पहिल्यांदा विजयाची चव चाखली. येथे खेळलेल्या पाच सामन्यांत भारताचा तो एकमेव विजय आहे.
शुभमनला मिळणार का पदार्पणाची संधी...न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलला पदार्पणाची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कारण कर्णदार विराट कोहलीने शुभमनची तोंडभरून स्तुती केली होती. माझ्यापेक्षाही शुभमनमध्ये चांगली गुणवत्ता या वयामध्ये आहे, असे कोहली म्हणाला होता. कोहलीच्या म्हणण्यानुसार शुभमनला चौथ्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळू शकते.
असा असेल संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, खलील अहमद, कुलदीप यादव.